-
‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेमुळे अभिनेत्री तितीक्षा तावडे घराघरांत लोकप्रिय झाली.
-
‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी सध्या तितीक्षा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते.
-
अलीकडेच तितीक्षा कोकणात आपल्या माहेरी गेली होती.
-
तितीक्षाने तिच्या आई-बाबांच्या लग्नाचा ४० वा वाढदिवस कोकणात गावी साजरा केला.
-
यावेळी त्यांनी आडिवरे येथील प्रसिद्ध महाकाली मंदिरात जाऊन दर्शन घेतलं.
-
गावचं घर, अंगण, नारळाच्या बागा, कोकणातील निसर्गरम्य वातावरण याची झलक अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे.
-
“लग्नाच्या ४० व्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन… हा सुंदर क्षण आम्ही परफेक्ट जागेवर साजरा करतोय – कोकण” असं कॅप्शन अभिनेत्रीने या फोटोंना दिलं आहे.
-
तितीक्षाने शेअर केलेल्या फोटोंवर नेटकऱ्यांसह मराठी कलाकारांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
-
दरम्यान, आता तितीक्षा नवीन कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. ( सर्व फोटो सौजन्य : तितीक्षा तावडे इन्स्टाग्राम )

मुंबईच्या रस्त्यावर फिरतोय भलामोठा अजगर; मुंबईकरांनो पावसाच्या पाण्यात चालताना सावधान! VIDEO पाहून घाम फुटेल