-
शेख हसीना यांच्या ‘मुजीब: द मेकिंग ऑफ अ नेशन’ या चरित्रात्मक चित्रपटातील भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेली बांगलादेशी अभिनेत्री नुसरत फारिया गंभीर अडचणीत सापडली आहे. ३१ वर्षीय नुसरतला रविवारी ढाक्यातील हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली. ती थायलंडला जाण्यासाठी निघाली होती. याबाबतचे वृत्त वृत्त स्थानिक वृत्तपत्राने दिले आहे.
-
हत्येच्या प्रयत्नाशी संबंधित एका प्रकरणात नुसरत फारियाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आश्चर्यकारक ट्विस्ट येत आहेत, तिच्या अटकेवरून अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
-
ढाका विमानतळावरील इमिग्रेशन विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२४ मध्ये हसीना सरकारविरोधात छेडलेल्या जनआंदोलनादरम्यान हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप नुसरतवर करण्यात आला आहे. याबद्दलचे अटक वॉरंट आधीच जारी करण्यात आले होते.
-
त्यानंतर तिची रवानगी ढाका मेट्रोपॉलिटन पोलिसांच्या गुप्तहेर शाखेच्या कार्यालयात करण्यात येईल, असे वृत्त प्रथम आलो वृत्तपत्राने दिले आहे.
-
इंडिया टुडेने पोलिसांच्या सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या बातमीनुसार, अटक झाल्यानंतर नुसरत फारियाला ढाकामधील वातारा पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे.
-
आंदोलनादरम्यान ढाक्यातील वातारा भागात एका विद्यार्थ्याच्या हत्येच्या प्रयत्नाशी संबंधित या प्रकरणात नाव असलेल्या १७ जणांपैकी फारिया ही एक आहे. २०२४ मध्ये शेख हसीना यांच्याविरोधात जनआंदोलन उसळले होते.
-
या आंदोलनामुळे देशभरात राजकीय तणाव निर्माण झाला आणि अखेर पंतप्रधान शेख हसीना यांना राजीनामा द्यावा लागला. फारियाने त्यांची भूमिका पडद्यावर साकारली. मात्र आरोपींमध्ये फारियाचे नाव समाविष्ट आहे.
-
अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी, नुसरत फारियाने रेडिओ जॉकी आणि टेलिव्हिजन प्रेझेंटर म्हणून सुरुवात केली. तिने २०१५ मध्ये ‘आशिकी’ या रोमँटिक सिनेमातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले, तो हिट ठरला. यानंतर तिने ‘हिरो ४२०’ (२०१६), ‘बादशाह – द डॉन’ (२०१६), ‘प्रेमी ओ प्रेमी’ (२०१७) आणि ‘बॉस २: बॅक टू रूल’ (२०१७) सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले.
-
या चित्रपटांमुळे तिच्या चाहत्यांमध्ये प्रचंड वाढ झाली. २०२१ मध्ये, फारियाने लंडन विद्यापीठातून कायद्याची पदवी पूर्ण केली.
-
२०२३ साली आलेल्या ‘मुजीब: द मेकिंग ऑफ अ नेशन’ या चित्रपटात नुसरत फारियाने शेख हसीना यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन भारतातील प्रसिद्ध दिग्दर्शक दिवंगत श्याम बेनेगल यांनी केले होते. बांगलादेश आणि भारत यांच्या संयुक्त निर्मितीने हा चित्रपट निर्मित केला होता. (सर्व फोटो साभार – नुसरत फारिया इन्स्टाग्राम)

विराट कोहलीची दहावीची मार्कशीट पाहिलीत का?फोटो होतोय व्हायरल, १०वीत किती होते मार्क? गणित विषयामध्ये तर…