-
‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ फेम लोकप्रिय गायिका कार्तिकी गायकवाडचा भाऊ कौस्तुभ गायकवाड अलीकडेच लग्नबंधनात अडकला.
-
कौस्तुभच्या लग्नसोहळ्यातील फोटो कार्तिकीने नुकतेच सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
त्याच्या पत्नीचं नाव काव्या असं आहे. कार्तिकीने या दोघांच्या लग्नाचे फोटो शेअर करत याला, “कौस्तुभ-काव्याची सप्तपदी” असं कॅप्शन दिलं आहे.
-
कौस्तुभ आणि काव्या यांनी लग्नसोहळ्यात मराठमोळा लूक केल्याचं पाहायला मिळत आहे.
-
नऊवारी साडी, हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा, दागिने, भांगेत कुंकू या लूकमध्ये कौस्तुभची पत्नी काव्या खूपच सुंदर दिसत आहे.
-
एका फोटोमध्ये कार्तिकी परंपरेनुसार काव्याच्या पायात जोडवी घालत असल्याचं पाहायला मिळत आहे.
-
याशिवाय काव्याच्या मंगळसूत्राच्या साध्या अन् सुंदर डिझाइनची देखील सर्वत्र चर्चा होत आहे.
-
कार्तिकीने भावाच्या लग्नाचे फोटो शेअर करताच सध्या संपूर्ण कलाविश्वातून कौस्तुभ-काव्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.
-
दरम्यान, कौस्तुभच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर त्याने आजवर अनेक गाजलेली गाणी गायली आहेत. कौस्तुभचं २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बॉईज’ चित्रपटातील ‘लग्नाळू’ गाणं सर्वत्र तुफान व्हायरल झालं होतं. ( सर्व फोटो सौजन्य : कार्तिकी गायकवाड इन्स्टाग्राम )

अक्षय कुमारला व्याजासहित पैसे परत केल्यानंतर परेश रावल यांचं ‘ते’ ट्विट चर्चेत, म्हणाले, “माझ्या वकिलांनी…”