-
अभिनेत्री सोनाली पाटील (Sonali Patil) बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वातून घराघरांत पोहोचली.
-
सोनाली पाटीलने सोनी टीव्हीवरील ‘जुळता जुळता जुळतंय की’ मालिकेत काम केले आहे.
-
तसेच वैजू नंबर १ या मालिकेत अभिनेत्रीने मुख्य भूमिका साकारली.
-
तसेच २०२४ मध्ये कलर्स मराठी वाहिनीवरील आई तुळजाभवानी या मालिकेतही तिने भूमिका साकारली होती.
-
याच मालिकेच्या सेटवरील लूक तिने आता इन्स्टाग्रामवरून शेअर केला आहे.
-
आई तुळजाभवानी या मालिकेत अभिनेत्रीने राजा महिषासुराच्या पत्नीची भूमिका साकारली होती.
-
शुंभा असे तिच्या पात्राचे नाव होते. दरम्यान, तिचे हे फोटो सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
-
या लूकमध्ये अभिनेत्री पारंपरिक मराठमोळ्या अंदाजात दिसून येत आहे. तिने पिवळ्या रंगाची साडी आणि खणाची चोळी परिधान केली आहे.
-
सोनालीने या “फोटोंना जुनं ते सोनं
आई तुळजाभवानी On set”, असं कॅप्शन दिलं आहे. -
चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर ‘अस्सल मराठमोळं सौंदर्य … कौतुक आणि आदर’, ‘चोळी मधे लय झाक दिसता ओ’, अशा कमेंट्स केल्या आहेत. (सर्व फोटो साभार- सोनाली पाटील इन्स्टाग्राम)

Raj Thackeray : राज ठाकरेंचं वक्तव्य; “ठाकरे-पवार ब्रँड संपवण्याचा प्रयत्न, पण मी लिहून देतो…”