-
‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकरने लग्नानंतर तिची पहिली वटपौर्णिमा साजरी केली आहे.
-
वटपौर्णिमेच्या सणासाठी अंकिताने खास पारंपरिक लूक केला होता.
-
गुलाबी रंगाची नऊवारी साडी, नाकात नथ, पारंपरिक दागिने या मराठमोळ्या लूकमध्ये अंकिता फारच सुंदर दिसत होती.
-
अंकिता व तिचा पती कुणाल भगत यांनी वटपौर्णिमेनिमित्त खास फोटोशूट केलं आहे.
-
‘पहिली वटपौर्णिमा’ म्हणत अंकिताने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
“नवरोबा आज माझ्याबरोबर तुझाही उपवास आहे. छान वाटलं मला…खात्री आहे हे सगळं आयुष्यभर निभावशील… वटपौर्णिमेच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!” असं कॅप्शन अंकिताने या फोटोंना दिलं आहे.
-
अंकिताने तिचा पती कुणाल अन् सासूबाईंसह माणगाव येथे वटपौर्णिमेचा सण साजरा केला.
-
यावेळी सासूबाईंबरोबरचा फोटो शेअर करत अंकिताने “Twinning With सासूआई” असं कॅप्शन या फोटोला दिलं आहे.
-
अंकिता व कुणालने वटपौर्णिमेनिमित्त केलेल्या फोटोशूटवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. ( सर्व फोटो सौजन्य : अंकिता वालावलकर, gauravkumbharphotography_ मेकअप आर्टिस्ट – mua_prachisabale )

Vat Purnima 2025 : वटपौर्णिमेनिमित्त जोडीदाराला पाठवा खास मराठी शुभेच्छा, फ्री HD Images सह मैत्रिणींनाही Whatsapp Status, Facebook वर करा शेअर