-
‘देवमाणूस-मधला अध्याय’ ही नवीन मालिका ‘झी मराठी’ वाहिनीवर २ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला आली. ‘देवमाणूस’चे यापूर्वीचे दोन्ही सीझन सुपरहिट ठरले होते. या मालिकेत अभिनेता किरण गायकवाड प्रमुख भूमिका साकारत आहे.
-
‘लागिरं झालं जी’, ‘देवमाणूस’ या मालिकांमुळे अभिनेता किरण गायकवाड घराघरांत लोकप्रिय झाला.
-
आज ( १२ जून ) किरणचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्याच्या पत्नीने खास पोस्ट शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
-
किरणबरोबर रोमँटिक फोटो शेअर करत वैष्णवीने याला “Happy Birthday अहो” असं कॅप्शन दिलं आहे.
-
१४ डिसेंबर २०२४ रोजी किरणने अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरशी लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. कोकणात मोठ्या थाटामाटात दोघांचा लग्नसोहळा पार पडला होता.
-
किरण-वैष्णवीच्या लग्नाला मालिकाविश्वातील बरेच कलाकार उपस्थित होते.
-
किरण आणि वैष्णवी यांनी एकत्र ‘देवमाणूस २’ या मालिकेत काम केलं होतं. याचवेळी दोघांची पहिली भेट झाली होती.
-
याशिवाय वैष्णवीने ‘तिकळी’, ‘तू चाल पुढं’ या मालिकांमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.
-
आज वाढदिवसानिमित्त संपूर्ण कलाविश्वातून किरण गायकवाडवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. ( सर्व फोटो सौजन्य : किरण गायकवाड व वैष्णवी कल्याणकर इन्स्टाग्राम )

Ahmedabad Plane Crash: ‘MAYDAY’… अहमदाबादमध्ये विमान कोसळण्याच्या काही क्षण आधी वैमानिकाचा संदेश!