-    उत्तराखंड येथील केदारनाथ धाम भगवान शिवशंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. दरवर्षी भाविक मोठ्या संख्येने केदारनाथ यात्रेला जातात. 
-    मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळीने नुकतीच केदारनाथ यात्रा पूर्ण केली. 
-    केदारनाथ मंदिरात दर्शन घेतल्यावर प्राजक्ताने सोशल मीडियावर खास फोटो शेअर केले आहेत. 
-    प्राजक्ता माळी गेल्या काही महिन्यांपासून १२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण करत आहे. केदारनाथ मंदिर बर्फवृष्टीमुळे दिवाळीनंतर सहा महिने बंद असतं. त्यामुळे मंदिराचे दरवाजे उघडल्यावर केदारनाथला जाणार असल्याचं प्राजक्ताने चाहत्यांना आधीच सांगितलं होतं. 
-    प्राजक्ता फोटो शेअर करत लिहिते, “श्री केदारनाथ…रुद्रप्रयाग- उत्तराखंड. अशाप्रकारे १२ ज्योतिर्लिंग यात्रेतील ११ व्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन निर्विघ्नपणे पार पडलं.” 
-    प्राजक्ताबरोबर केदारनाथ यात्रेत मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकर देखील सहभागी झाली होती. 
-    “यावेळी कुटुंबासमवेत अमृता देखील यात्रेत सहभागी झाली, याचा अत्यानंद आहे.” असं प्राजक्ताने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 
-    प्राजक्ताने शेअर केलेल्या फोटोंवर नेटकऱ्यांनी, “हर हर महादेव” म्हणत कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 
-    याशिवाय अमृता खानविलकरने देखील केदारनाथ यात्रेदरम्यानचे सुंदर फोटो तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. ( सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता माळी इन्स्टाग्राम ) 
 
  Guru Purnima 2025 Wishes: गुरुपौर्णिमेच्या तुमच्या गुरुजनांना द्या हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर मेसेज 
   
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  