-
हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२४नुसार, अमिताभ बच्चन हे शाहरुख खान, जुही चावला आणि हृतिक रोशन यांच्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीतील चौथे सर्वात श्रीमंत स्टार आहेत.
-
अमिताभ बच्चन यांची एकूण संपत्ती १६०० कोटी रुपये आहे. चित्रपटांव्यतिरिक्त, त्यांच्याकडे टीव्ही, जाहिराती आणि रिअल इस्टेटसह उत्पन्नाचे अनेक स्रोत आहेत.
-
पिंकव्हिलाच्या वृत्तानुसार, अमिताभ बच्चन यांचे उत्पन्न अनेक स्रोतांमधून येते, ज्यात चित्रपट, ब्रँड एंडोर्समेंट आणि गेम शो ‘कौन बनेगा करोडपती’ यांचा समावेश आहे.
-
भारतीय चित्रपटसृष्टीतील काही मोठ्या चित्रपटांमध्ये काम करण्यापासून ते प्रमुख ब्रँड्ससाठी सर्वोच्च पसंती असण्यापर्यंत, अमिताभ बच्चन यांना अजूनही मोठी मागणी आहे. यातून त्यांची कमाई ३५० कोटी रुपये आहे, असे वृत्त पिंकव्हिलाने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.
-
या वर्षी अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ३५० कोटी रुपयांच्या कमाईवर १२० कोटी रुपयांचा कर भरला आहे. त्याचा ५२.५ कोटी रुपयांचा शेवटचा आगाऊ कर हप्ता १५ मार्च २०२५ रोजी भरण्यात आला आहे.
-
अमिताभ बच्चन प्रत्येक चित्रपटासाठी सुमारे १०-१२ कोटी रुपये मानधन घेतात.
-
ते डॉ. फिक्सिट, इंडिया गेट बासमती राईस, जस्ट डायल, डाबर च्यवनप्राश, गुजरात टुरिझम, आयडीएफसी फर्स्ट बँक आणि इतर अनेक ब्रँड्सचे ब्रँड अॅम्बेसेडर आहेत.
-
यातील प्रत्येक जाहिरातीसाठी ते सुमारे ५-८ कोटी रुपये घेतात.
-
दरवर्षी जवळजवळ पाच ते सहा महिने चालणाऱ्या ‘कौन बनेगा करोडपती’ कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनासाठी ते सुमारे ४०-५० कोटी रुपये कमवतात. (सर्व फोटो सौजन्य: अमिताभ बच्चन, फेसबुक)

अखेर ३ महिन्यांनी पैसाच पैसा! राजयोगामुळे ‘या’ राशींच्या नशिबात फक्त प्रमोशन, पगारवाढच नाही तर…