-
आपल्या दिलखेचक अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री ऋता दुर्गुळे सध्या अमेरिकेच्या भटकंतीवर निघाली असून, तिने सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
-
तिच्या या ‘ट्रॅव्हल डायरीज’मुळे तिच्या चाहत्यांनाही घरबसल्या अमेरिकेची सफर घडत आहे.
-
गेल्या काही दिवसांपासून ऋता अमेरिकेतील वेगवेगळ्या शहरांना भेटी देत आहे.
-
आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये ऋताने म्हटले आहे, “That one curious tourist who wants to read everything everywhere! ” म्हणजेच, “ती एक उत्सुक पर्यटक, जिला प्रत्येक ठिकाणी सर्व काही वाचायचे आहे!” तसेच, “As if kuch yaad rehne wala hain ” असे म्हणत तिने हलकीफुलकी टिप्पणीही केली आहे.
-
या फोटोमध्ये ती ब्रुकलिन ब्रिजवर गुलाबी रंगाच्या जॅकेटमध्ये आणि चेहऱ्यावर गोड हास्य घेऊन दिसत आहे.
-
Living my ‘Kal Ho Na Ho’ Moment’ असे कॅप्शन तिने दिले आहे.
-
कामाच्या व्यस्ततेतून वेळ काढून जग फिरण्याचा ऋताचा हा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे.
-
सर्व फोटो साभार- ऋता दुर्गुळे इन्स्टाग्राम

Air India Plan Crash: दुर्घटनाग्रस्त विमानाच्या ब्लॅक बॉक्समधील डेटा मिळाला, केंद्रीय मंत्रालयाने दिली माहिती!