-
मराठमोळी अभिनेत्री हेमल इंगळे सध्या पोर्तुगालमधील मडेरा बेटावर व्हेकेशनसाठी गेली आहे.
-
तिथल्या सफरीचे फोटो तिने शेअर केले आहेत. हेमलचे हे फोटो अत्यंत सुंदर आहेत.
-
तिने या फोटोंना दिलेले कॅप्शन सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
-
इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करताना हेमलने “These 3 days on this island have been one of the best days of my life” असे कॅप्शन तिने दिले आहे.
-
यावेळी हेमलने मडेरा बेटावरील निसर्गाचा भरपूर आनंद घेतला असल्याचं फोटोंमधून पाहायला मिळत आहे.
-
दरम्यान, मडेरा हे पोर्तुगाल देशातील एक बेट आहे, जे अटलांटिक महासागरात आहे.
-
हे बेट पोर्तुगालच्या मुख्य भूभागाच्या नैऋत्येस १ हजार किलोमीटर अंतरावर आहे. मडेरा हे द्वीपसमूहाचा भाग असून त्यात मडेरा आणि पोर्टो सॅंटो ही दोन मानवी वस्ती असलेली बेटे आणि दोन निर्जन बेटे, डेझर्टास आणि सेल्व्हॅगेन्स यांचा समावेश आहे.
-
मडेरा बेट पोर्तुगालच्या स्वायत्त प्रदेशाचा भाग आहे आणि तेथील हवामान वर्षभर सुखद असते, ज्यामुळे ते पर्यटकांचं एक आवडीचं ठिकाण आहे.
-
दरम्यान, हेमल इंगळेने २०२४ मध्ये ‘नवरा माझा नवसाचा २’ या मराठी चित्रपटामध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले होते.
-
तसेच २०२४ मध्ये तिने तिचा प्रियकर रौनक चोरडियाबरोबर लग्नही केले आहे. (सर्व फोटो साभार- हेमल इंगळे इन्स्टाग्राम) हेही पाहा- MS Dhoni Birthday: जीम ते फुटविअर, हॉटेल ते फिल्म प्रोडक्शन; महेंद्रसिंग धोनीने ‘या’ कंपन्यांमध्ये गुंतवला आहे पैसा…

Vadodara Bridge Collapse : गुजरातमध्ये मोठी दुर्घटना, महिसागर नदीवरील पूल कोसळला, अनेक वाहनं नदीत पडली, ९ जणांचा मृत्यू