-
Kapil Sharma
कपिल शर्माच्या कॅनडामधील सरे इथे नुकत्याच सुरू केलेल्या ‘कॅप्स कॅफे’वर गोळीबार करण्यात आला आहे. कपिल शर्मा आणि त्याची पत्नी गिन्नी यांनी काही दिवसांपूर्वीच हा कॅफे सुरू केला होता. आज आपण भारतातील इतर सेलिब्रिटींच्या हॉटेल-कॅफेंबद्दल जाणून घेऊयात.. -
Shilpa shetty
शिल्पा शेट्टीचे मुंबईत ‘बास्टियन’ नावाचे रेस्टॉरंट आहे. ते दादरमधील कोहिनूर इमारतीच्या वरच्या बाजूला आहे. बास्टियन हे एक लोकप्रिय सेलिब्रिटी रेस्टॉरंट आहे, याच नावाने शिल्पाचे आणखी एक रेस्टॉरंट बंगळूरुमध्ये आहे. -
Badshah
बादशाह एक प्रसिद्ध भारतीय रॅपर, गायक, गीतकार, संगीत निर्माता, आणि टीव्ही व्यक्तिमत्व आहे. तो एक यशस्वी उद्योजक देखील आहे. त्याने विविध व्यवसायांमध्ये गुंतवणूक केली आहे, ज्यात हॉस्पिटॅलिटी, फॅशन, आणि फूड इंडस्ट्री यांचा समावेश आहे. त्याने अलीकडेच मुंबईत बॅड बॉय पिझ्झा लाँच केला. -
Boby Deol
बॉबी देओलचे ‘समप्लेस एल्स’ (Someplace Else) नावाचे रेस्टॉरंट आणि लाउंज आहे, जे मुंबईतील अंधेरी येथे आहे. या ठिकाणी भारतीय आणि चायनीज खाद्यपदार्थ मिळतात. -
Malaika Arora
मलायका अरोराचे मुंबईत स्कारलेट हाऊस नावाचे रेस्टॉरंट आहे, जे तिने तिच्या मुलासोबत सुरू केले आहे. हे रेस्टॉरंट वांद्रे (Bandra) येथील पाली व्हिलेज (Pali Village) मध्ये आहे. तिने मुलगा, अरहान खानबरोबर मिळून हे रेस्टॉरंट सुरू केले आहे. हे रेस्टॉरंट एका ९० वर्षे जुन्या बंगल्यात आहे. -
Gauri Khan
शाहरुखची पत्नी गौरी खानने मुंबईत ‘टोरी’ नावाचे रेस्टॉरंट सुरू केले आहे, इथे पॅन-आशियाई खाद्यपदार्थ (pan-Asian cuisine) मिळतात. हे रेस्टॉरंट वांद्रे (Bandra) येथे आहे आणि गौरी खानने स्वतःच डिझाइन केले आहे. टोरी हे एक सेलिब्रिटी हॉटस्पॉट (celebrity hotspot) म्हणूनही ओळखले जाते. -
Kangana Ranaut
कंगना रणौतने हिमाचल प्रदेशात ‘द माउंटन स्टोरी’ हे रेस्टॉरंट उघडले आहे. हे तिचे खास स्वप्न होते. -
Karan Johar
करण जोहरचे मुंबईत ‘न्यूमा’ नावाचे रेस्टॉरंट आहे. हे रेस्टॉरंट कुलाबा येथे आहे आणि तिथे युरोपीययन-शैलीतील जेवण मिळते. न्यूमा हे करण जोहरने True Palette Cafe Private Limited आणि धर्मा कॉर्नरस्टोनचे CEO बंटी सजदेह यांच्यासोबत मिळून सुरू केले आहे. -
Virat Kohli
विराट कोहलीचे ‘वन8 कम्यून’ नावाचे रेस्टॉरंट्स आहेत जे मुंबई, दिल्लीसह विविध शहरांमध्ये आहे. हेही पाहा- Wimbledon 2025: साराने पहिल्यांदा पाहिली विम्बल्डन स्पर्धा; आई वडिलांबरोबरचा सेल्फी ते हटके कॅप्शन चर्चेत…

Russian woman in Karnataka cave: “जनावरांनी आमच्यावर हल्ला केला नाही, पण माणसांची..”, दोन मुलींसह गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेनं काय सांगितलं?