-
मनोरंजन विश्वातील सध्याच्या काही आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे प्राजक्ता माळी.
-
मराठी मालिका, चित्रपट तसंच रिअॅलिटी शोमधून प्राजक्ताने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.
-
अभिनेत्री असण्याबरोबरच प्राजक्ता एक यशस्वी उद्योजिका आणि निर्मातीसुद्धा आहे.
-
अभिनेत्री सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. अशातच तिने शेअर केलेला एक व्हिडीओ लक्ष वेधून घेत आहे.
-
प्राजक्ताने कुटुंबासह सेलिब्रेशन केल्याचे खास क्षण शेअर केले आहेत आणि या सेलिब्रेशनचं कारणही सांगितलं आहे.
-
प्राजक्ताच्या कर्जतमधील फार्महाऊसला दोन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त त्यांनी हे सेलिब्रेशन केलं.
-
शिवाय नुकत्याच झालेल्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यातही ‘फुलवंती’ या चित्रपटाने चांगली कामगिरी केली.
-
फार्महाऊसला दोन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आणि ‘फुलवंती’ला मिळालेल्या फिल्मफेअर पुरस्कारांबद्दल तिने हे सेलिब्रेशन केलं.
-
प्राजक्ताने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये सगळे जण आनंद साजरा करत असल्याचं पाहायला मिळत आहे. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
-
दरम्यान, या व्हिडीओवर चाहत्यांनी आणि कलाकारांनी लाईक्स आणि कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे.

Prakash Mahajan : “तुम्ही प्रवक्त्याला एवढं तुच्छ समजता?”, मनसेचा बडा नेता राज ठाकरेंवर नाराज; बोलून दाखवली खंत; म्हणाले, “मला पक्षाने…”