-
अभिनेत्री जुई गडकरीने ८ जुलै रोजी तिचा ३७ वा वाढदिवस साजरा केला. सध्या अभिनेत्री ‘ठरलं तर मग’ मालिकेत प्रमुख भूमिका साकारत असल्याने सेटवर सुद्धा जुईच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन करण्यात आलं.
-
यावेळी जुई गडकरीने सर्वांच्या उपस्थितीत केक कापला.
-
अभिनेत्री जुई गडकरीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तिचे चाहते खास मालिकेच्या सेटवर पोहोचले होते. तसेच सहकलाकारांनी देखील जुईचा वाढदिवस दणक्यात साजरा केला. मालिकेच्या टीमसह काम करणाऱ्या संजना पाटील यांनी जुईला तिच्या विविध फोटोंचा अल्बम बर्थडे गिफ्ट म्हणून दिला.
-
मालिकेत विमलची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री मयुरी मोहितेने जुईसाठी खास चॉकलेट्स आणले होते.
-
मालिकेत सतत भांडणाऱ्या प्रियाने म्हणजेच अभिनेत्री प्रियांका तेंडोलकरने जुईला कॉफीमग भेट म्हणून दिला. या ‘कॉफीमग’चा फोटो शेअर करत अभिनेत्रीने ‘सुपर क्युट Mug’ असं म्हटलं आहे.
-
सायलीच्या लाडक्या सासूबाई म्हणजेच अभिनेत्री प्राजक्ता कुलकर्णी यांनी जुईला बॅग भेट म्हणून दिली आहे.
-
सायलीच्या वाढदिवसानिमित्त मालिकेतील अस्मिता म्हणजेच मोनिका दबाडेने खास ‘चॉकलेट फज जार’ बनवून आणले होते.
-
याशिवाय सायलीच्या एका चाहतीने तिला मोठा चॉकलेट बॉक्स भेट म्हणून दिला.
-
तर, अभिनेत्रीला दुसऱ्या एका चाहतीने सुंदर फोटो फ्रेम भेट दिली. अशाप्रकारे जुईने तिचा यंदाचा वाढदिवस सेटवर साजरा करत सेलिब्रेशन केलं. ( सर्व फोटो सौजन्य : जुई गडकरी इन्स्टाग्राम )

Devendra Fadnavis : “शिवसेना आजही आमचा मित्र पक्ष, पण…”, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य