-
मला त्याचा विनोदाचा स्वभाव खूप आवडतो. एक वेळ अशी होती की, मला थोडं वाईट वाटत होतं. कारण- तो थोडा चिडचिडा वाटला. मी खूप रागावले आणि रडायला लागले. पण तो मागे वळून म्हणाला, ‘रडायचं आहे का? चल, आपण दोघं एकत्र रडूया. मीही रडतो.’ हे ऐकून मी हसायला लागले, कारण ते खूप गोड आणि मजेशीर होतं.”
फराहनं शेअर केलं, “फिल्म इंडस्ट्रीत काम करताना विनोदबुद्धी असणं खूप गरजेचं असतं.” -
विनोदाची तीव्र भावना का महत्त्वाची आहे, हे समजून घेण्यासाठी आम्ही एका तज्ज्ञाशी बोललो.
मानसोपचारतज्ज्ञ, ऊर्जा उपचारक व जीवन प्रशिक्षक डेलना राजेश म्हणाल्या, “त्याचं वागणं असंवेदनशील नव्हतं, तर त्यामागे भावनिक समज होती. ती त्यानं विनोदातून दाखवली. मानसशास्त्रज्ञ त्याला सर्जनशील भावनिक पुनर्रचना, असं एक वेगळं नाव देतात. म्हणजेच भावनांना वेगळ्या पद्धतीने हाताळणं. -
डेल्ना म्हणाल्या, विनोदामध्ये वेदना स्वीकारण्याची ताकद असते. त्याचप्रमाणे नात्यामध्ये अशी एक ताकद असते जी आपल्याला.कठीण परिस्थितून बाहेर काढू शकते.
-
प्रेमात गडद विनोद का उपयोगी ठरतो, यावर डेल्ना म्हणाल्या :
जेव्हा दोन माणसांचं नातं भावनिकदृष्ट्या मजबूत असतं, तेव्हा काही वेळा बोलणं कठीण होतं अशा वेळी विनोद आपल्या मदतीला येतो. तो तणाव, चिंता व दुःख हलकं करण्यास मदत करतो. विशेषतः जेव्हा दोघांनाही माहीत असतं की, हा विनोद थट्टेसाठी नाही, तर भावना व्यक्त करण्यासाठी आहे. -
विनोदाचा जाणूनबुजून वापर केल्यास समोरच्या व्यक्ती आणि नात्यावर त्याचा परिणाम होतो.
-
भावनिक विनोद म्हणजे फक्त व्यक्तीच्या स्वभावाचा भाग नसतो, तर ते चांगलं नातं टिकवण्याचं एक साधन असतं.
-
मस्करी करण्यापूर्वी थांबा आणि समजून घ्या – समोरचा अजूनही दुखावलेला आहे का, की तो हसण्यासाठी तयार आहे?
हसवण्याआधी खात्री करून घ्या.
कुणाच्याही दु:खावर, त्यांच्या खासगी जखमांवर किंवा दुःखांवर विनोद करू नका.
विनोदाचा वापर नातं घट्ट करण्यासाठी करा; टाळण्यासाठी नाही. विनोद म्हणजे मागं पळणं नाही, तर तो दोघांना जोडणारा एक धागा आहे. -
नात्यामध्ये प्रेम असणं खूप महत्त्वाचं असत, भावना समजून घेणं आणि समोरच्यानं कोणताही विचार न करता आपल्यासमोर व्यक्त होणं गरजेचं असतं. नात्यामध्ये कठोरपणा असता नये. विशेषतः पुरुषांमध्ये कठोरता जास्त असते. मनमोकळे राहणं महत्त्वाचं आहे, असे डेल्ना यांनी सांगितलं.
