-
स्मृती इराणी यांनी अभिनय केलेली मालिका ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’ चा सीझन २ येत आहे.
-
तुलसी
‘क्युंकी सास भी कभी बहू थी’ या मालिकेत त्यांनी तुलसीची भूमिका साकारली होती. -
राजकीय जीवनातूनही घराघरात प्रसिद्ध झालेल्या स्मृती इराणी र पुन्हा एकदा टीव्हीच्या जगात परतणार आहेत. चाहते त्यांना पुन्हा टीव्हीवर पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.
-
शो २९ जुलैपासून प्रसारित होणार आहे. दरम्यान, आज आपण स्मृती इराणींच्या इतर मालिंकाबद्दल जाणून घेऊयात..
-
तीन बहुरानियां
त्यांची २००७ ते २००९ दरम्यान तीन बहुरानियां नावाची एक टीव्ही मालिका प्रसारित होत होती. २००८ ते २००९ दरम्यान प्रसारित झालेल्या भागांमध्ये स्मृती इराणी दिसल्या होत्या. या मालिकेत स्मृती यांनी वृंदा सुमित देसाई ही भूमिका साकारली होती. -
थोडी सी जमीन और थोडा सा आसमान
२००६ ते २००७ दरम्यान स्टार प्लसवर थोडी सी जमीन और थोडा सा आसमान नावाची मालिका प्रसारित होत असे. या मालिकेत स्मृती इराणी एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसल्या होत्या. स्मृती इराणींच्या पात्राचे नाव उमा होते. -
maniben.com
२००९ ते २०१० दरम्यान सब टीव्हीवर मणिबेन डॉट कॉम नावाची एक मालिका प्रसारित झाली होती. या मालिकेतील स्मृती इराणी यांच्या पात्राचे नाव मणिबेन होते. -
विरुध्द: हर रिश्ता का कुरुक्षेत्र
विरुध्द: हर रिश्ता का कुरुक्षेत्र ही मालिका २००७ ते २००८ दरम्यान सोनी टीव्हीवर प्रसारित झाली होती. या मालिकेतील स्मृती इराणी यांच्या पात्राचे नाव वसुधा शर्मा होते. -
रामायण
२००१ मध्ये झी टीव्हीवर रामायण प्रसारित होत असे. या रामायण मालिकेत स्मृती इराणी माता सीतेच्या भूमिकेत दिसल्या होत्या. हेही पाहा- Amazon Salary Revealed : इंजिनिअर ते मॅनेजर; अॅमेझॉन कोणाला किती देते पगार? कर्मचाऱ्यांच्या वेतनाची माहिती उघड…

Dussehra Wishes 2025: दसऱ्याला प्रियजनांना पाठवा मराठी शुभेच्छा! WhatsApp, Instagram, Facebook वर शेअर करा PHOTOS