-
आजही मोठ्या सन्मानाचे मानकरी
सुप्रसिद्ध अभिनेता संजय दत्त आज २९ जुलै रोजी ६६ वर्षांचे झाले. बॉलीवूडमध्ये त्यांच्या चार दशकांच्या प्रवासाला आजही मोठा सन्मान मिळतो. -
फिल्मी सुरुवात
१९८१ मध्ये ‘रॉकी’ चित्रपटातून त्यांनी पदार्पण केलं. वडील सुनील दत्त यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनी सिनेसृष्टीत आपली ओळख निर्माण केली. -
यशस्वी चित्रपट
‘खलनायक’, ‘साजन’, ‘वास्तव’ व ‘मुन्नाभाई एम.बी.बी.एस.’ हे त्यांच्या करिअरमधील टप्पे ठरले. या भूमिकांनी त्यांना मास ‘हीरो’ म्हणून मान्यता मिळवून दिली. -
वादग्रस्त काळ
१९९३ मध्ये बॉम्बस्फोट प्रकरणात त्यांना अटक झाली. शस्त्रसाठा प्रकरणामुळे त्यांनी तुरुंगवास भोगला, ज्यामुळे त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलले. -
व्यसनमुक्तीची लढाई
एकेकाळी ते ड्रग्जच्या आहारी गेले होते. मात्र, त्यांनी स्वतःमध्ये सुधारणा केली आणि व्यसनमुक्त होऊन नव्याने आयुष्य सुरू केले. -
‘मुन्नाभाई M.B.B.S.’मुळे संजय दत्तना नवसंजीवनी
२००३ मध्ये आलेल्या ‘मुन्नाभाई M.B.B.S.’ या चित्रपटाने संजय दत्त यांना नवसंजीवनी दिली. तुरुंगवास, व्यसन व वादांमुळे गमावलेली प्रतिमा त्यांनी या भूमिकेतून पुन्हा उभी केली. एक साधा गँगस्टर डॉक्टर होतो, ही भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. -
चाहत्याच्या प्रेमाचे उदाहरण
एका चाहतीने आपल्या संपत्तीपैकी ७२ कोटी रुपये त्यांच्या नावावर लिहून ठेवले होते. संजय दत्त यांनी ती मालमत्ता स्वीकारण्यास नकार देत, सामाजिक जबाबदारीचे उदाहरण दिले. -
वैयक्तिक आयुष्य पत्नी
मान्यता दत्त आणि दोन मुलांसह ते कुटुंबप्रेमी आयुष्य जगतात. मान्यता यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खास भावनिक पोस्ट शेअर केली. -
सध्या सुरू असलेली कामगिरी
‘The RajaSaab’, ‘KD – The Devil’ व ‘Akhanda 2’ हे त्यांचे आगामी चित्रपट आहेत. ते सध्या प्रॉडक्शन आणि ब्रँडिंगमध्येही सक्रिय आहेत. -
(सर्व फोटो सौजन्य :संजय दत्त/ इंस्टाग्राम)

बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार लवकरच ‘या’ राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ? डिसेंबर २०२५ पर्यंत होऊ शकतात गडगंज श्रीमंत