-
५० वर्षांचा टप्पा अनेकांसाठी आरोग्य आणि तंदुरुस्तीसाठी आव्हान ठरतो. मात्र, काही भारतीय स्टार्स दाखवून देतात की, वय ही फक्त एक संख्या आहे. शिस्त, सजग आहार आणि अनोख्या कसरतींमुळे ते पन्नाशीतही मजबूत, तेजस्वी आणि आकर्षक दिसतात. ‘ते’ स्टार्स कोण आणि ते कसे स्वत:ला फिट राखू शकले ते पाहू….
-
शिल्पा शेट्टी : प्रभावी दैनंदिन सवयींद्वारे तंदुरुस्ती
शिल्पा शेट्टी तिच्या तंदुरुस्तीचे रहस्य साध्या, पण प्रभावी दैनंदिन सवयींमध्ये शोधते. सकाळची सुरुवात ती कोमट पाणी, ज्यूसने करते, ज्यामुळे तिचे शरीर डिटॉक्सिफाय होऊन आणि तिची पचनक्रिया सुधारते. तिच्या आहारात तूप, केळी आणि नारळाचे दूध असते; तर संध्याकाळी ७:३० पर्यंत ती आवर्जून हलके जेवण घेते. संतुलित कार्बोहायड्रेट्सयुक्त आहारातील सातत्य हेच तिच्या फिटनेसचे गुपित आहे. -
माधुरी दीक्षित : नृत्याच्या सरावाला हलक्या व्यायामाची जोड
माधुरी दीक्षितसाठी नृत्य ही फक्त कला नाही, तर तिच्या आरोग्याचे गुप्त शस्त्र आहे. ती आठवड्यातून चार ते पाच वेळा कथ्थकचा सराव करते आणि त्याला ती योगा व हलक्या कार्डिओ व्यायामाची जोड देते. तिच्या आहारात नारळ पाणी, उच्च प्रथिने आणि हलके, कमी वेळा घेतलेले जेवण असते. लवकर संध्याकाळी जेवण आणि हर्बल चहाच्या साथीने योग्य हायड्रेशन हीच तिच्या फिटनेसची गुरुकिल्ली ठरते. -
अक्षय कुमार : शिस्तीतला फिटनेस
अक्षय कुमारची ओळखच म्हणजे शिस्त. आठवड्यातून एक दिवस तो पूर्ण उपवास पाळतो आणि संध्याकाळी ६:३० वाजेपर्यंत लवकर जेवण आटोपतो. जड वेटलिफ्टिंगपेक्षा तो गिर्यारोहण, मैदानी खेळ व योगासारखा कार्यात्मक व्यायाम यांना प्राधान्य देतो. त्यामुळेच तो नेहमी सडसडीत चपळ व ऊर्जावान दिसतो. -
सलमान खान: सातत्याची ताकद
सलमान खानचा फिटनेस दिनक्रम गेल्या अनेक दशकांपासून बॉलीवूडमध्ये चर्चेचा विषय आहे. त्याच्या ५९ वर्षांच्या वयातही तो दररोज दोन ते तीन तास व्यायामाला वेळ देतो. वजन प्रशिक्षणासोबतच तो सायकलिंग, पोहणे आणि फंक्शनल ट्रेनिंग करतो. अंडी, मासे, चिकन आणि भाज्या यांनी समृद्ध उच्च प्रथिनयुक्त आहार घेत तो जंक फूडपासून दूर राहतो. त्याचा शॉर्टकटपेक्षा सातत्य आणि कठोर परिश्रमातून यश मिळू शकते यावर त्याचा ठाम विश्वास आहे. -
तब्बू : शांततेतलं आरोग्य
तब्बू तिच्या आरोग्य प्रवासात शांतता आणि संतुलनाला महत्त्व देते. ती आठवड्यातून दोन ते तीन वेळा ध्यानाचा सराव करते. तिच्या दिनचर्येत हलक्या वॉर्म-अपयुक्त व्यायामाचा समावेश असून, ती संतुलित आहार आणि निरोगी शरीर ठेवण्यावर भर देते. जिममधील अवास्तव कष्टांपेक्षा शरीर आणि मनाचं पोषण हाच तिचा दृष्टिकोन आहे. -
शाहरुख खान : साधेपणावर आधारलेला फिटनेस
शाहरुख खान त्याचा फिटनेस साधेपणावर टिकवून ठेवतो. दिवसातून तो सहसा फक्त दोन वेळा पौष्टिक जेवण घेतो, ज्यामध्ये स्प्राउट्स, ग्रील्ड चिकन व ब्रोकोलीचा समावेश असतो. स्नॅक्स टाळून आणि कमी झोप मिळाली तरीही रात्री उशिरापर्यंतच्या शूटिंगनंतर तो जलद वर्कआउट्स करून, आपलं शरीरयष्टी चांगली ठेवण्याला प्राधान्य देतो. अपारंपरिक दिनचर्येमधूनही तो सातत्य साधतो, हेच त्याच्या फिटनेसचे वैशिष्ट्य आहे.

बाबा वेंगांची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये जगावर मोठं संकट कोसळणार? AI वरील तर… खतरनाक भाकितं वाचून बसेल धक्का