-
मंडळी ओणम सणानिमित्त मराठी अभिनेत्रीने केलेलं फोटोशूट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे.
-
तुम्ही या अभिनेत्रीला ओळखलं का? ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून मराठमोळी भरतनाट्यम डान्सर व अभिनेत्री सुखदा खांडकेकर आहे.
-
सुखदाने केलेला हा लूक सध्या नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे.
-
सुखदाने यावेळी अतिशय आकर्षक अशी लाल रंगाचं मिश्रण असलेली दाक्षिणात्य नऊवारी साडी परिधान केली आहे.
-
या साडीवर तिने खूप सुंदर असे पारंपरिक दागिने परिधान केले आहेत.
-
तिने या फोटोंना इन्स्टाग्रामवर शेअर करताना “हा ओणम तुमच्या आयुष्यात खूप आशा आणि प्रकाश घेऊन येवो. ओणमच्या शुभेच्छा.” असं फोटोकॅप्शन दिलं आहे.
-
सुखदा प्रसिद्ध अभिनेता ‘चला हवा येऊ द्या, कॉमेडीचं गँगवॉर’ हा शो होस्ट करणाऱ्या अभिजीत खांडकेकरची पत्नी आहे.
-
दरम्यान ओणम सणाबद्दल सांगायचं झाल्यास, केरळमध्ये हा सण धुमधडाक्यात साजरा केला जातो. विष्णूच्या वामन अवताराच्या आणि बळीराजाच्या कल्पित आगमनाप्रीत्यर्थ हा सण मल्याळी लोकांत उत्साहाने साजरा केला जातो.
-
मल्याळी कॅलेंडरमधील चिङ्ग्यम महिन्यातील पहिल्या दिवसापासून दहा दिवस चालणारा हा आनंदोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. हा सण दहा दिवसांचा असला तरी त्यातील पहिल्या दिवसाला महत्त्व असते. या सणाचा पहिला दिवस गणेश चतुर्थीपासून सुरू होतो. त्याला ‘अत्तम’ म्हणतात. ओणम हा समृद्धी, एकता आणि निसर्गाच्या विपुलतेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा उत्सव आहे.
-
दहाव्या दिवशी म्हणजे तिरूओणमच्या दिवशी लवकर उठून स्नान केल्यावर नवे कपडे घालून देवदर्शन करण्याची लोकांमध्ये लगबग असते. या सणाचे मुख्य आकर्षण असते मेजवानी. नाश्त्याला केरळमध्ये खास मिळणारी केळी उकडून खायला दिली जातात. त्याबरोबरच पिकलेल्या केळ्यांसह पापडम्चा खासा फराळ असतो. (सर्व फोटो साभार- सुखदा खांडकेकर इन्स्टाग्राम) हेही पाहा- १८ वर्षांनी अरुण गवळी तुरुंगाबाहेर, दगडी चाळीत घुमला ‘डॅडी’चा ‘जय शंभू नारायण’चा नारा

शनीच्या कृपेने कोणत्या राशीला आज लाभेल धनलाभाची संधी? वाचा मेष ते मीनचे शनिवार विशेष राशिभविष्य