-
मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने बाप्पाच्या विसर्जनाचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
अभिनेत्रीने यंदा स्वत:च्या हातांनी लाडक्या बाप्पाची मूर्ती साकारली होती. त्याच बाप्पाला आज निरोप दिला जात आहे.
-
लाडक्या बाप्पाला निरोप देतानाचे काही भावुक क्षण सोनालीने आपल्या सोशल मीडियाद्वारे शेअर केले आहेत.
-
सोनालीने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तिचं संपूर्ण कुटुंबही पाहायला मिळत आहे.
-
इतकंच नव्हे तर सोनालीचा नवरा कुणालही या विसर्जनात सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे.
-
‘गणपती चालले गावाला… चैन पडे ना आम्हाला…; पुढच्या वर्षी लवकर या…’ अशी कॅप्शन देत तिने फोटो शेअर केले आहेत.
-
बाप्पाच्या निरोपाच्या क्षणांसह तिच्या घरी बाप्पाचं दर्शन घ्यायला आलेल्या पाहुण्यांचे फोटोसुद्धा सोनालीने शेअर केले आहेत.
-
सोनालीने शेअर केलेल्या फोटोमध्ये प्रार्थना बेहेरे, सिद्धार्थ जाधव तसंच कुटुंबीय पाहायला मिळतं आहे. (फोटो सौजन्य : सोनाली कुलकर्णी इन्स्टाग्राम)
-
दरम्यान, सोनाली कुलकर्णीच्या या फोटोला तिच्या अनेक चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे.

पुढच्या वर्षी बाप्पा उशिरा येणार! ‘या’ तारखेला साजरी केली जाईल गणेश चतुर्थी