-
प्रसिद्ध पंजाबी अभिनेत्री सोनम बाजवा सध्या तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘बागी ४’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील तिचा अभिनय लोकांना खूप आवडला.
-
टायगर श्रॉफ आणि संजय दत्तसोबत काम केल्यानंतर, ती आता सनी देओल स्टारर ‘बॉर्डर २’ चित्रपटाचा भाग होणार आहे. (फोटो क्रेडिट: सोनम बाजवा/इंस्टा
-
अलिकडेच, निर्मात्यांनी सोशल मीडियावर ही माहिती शेअर केली आहे. ‘बॉर्डर २’ च्या निर्मात्या निधी दत्ता यांनी सोनमचे फोटो शेअर केले आणि तिचे टीममध्ये स्वागत केले.
-
तसेच, या चित्रपटात ती अभिनेता दिलजीत दोसांझसोबत दिसणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सोनम बाजवा आणि दिलजीत दोसांझ यांनी यापूर्वी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.
-
‘पंजाब १९८४’, ‘सरदारजी २’, ‘सुपर सिंग’ आणि ‘हौसला राख’ मध्ये ते एकत्र दिसले होते आणि आता चाहते त्यांना ‘बॉर्डर २’ मध्ये एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
-
‘बॉर्डर २’ या चित्रपटात सोनम आणि दिलजीत व्यतिरिक्त अभिनेता सनी देओल, वरुण धवन, अहान शेट्टी, मेधा राणा यांच्यासह अनेक स्टार्स दिसणार आहेत.
-
या चित्रपटाचे चित्रीकरण बऱ्याच प्रमाणात पूर्ण झाले आहे आणि आता निर्माते लवकरच त्याच्या प्रदर्शनाची तयारी करक आहेत. १९९७ मध्ये प्रदर्शित झालेल्या क्लासिक चित्रपट ‘बॉर्डर’चा हा सिक्वेल आहे. (फोटो क्रेडिट: सोनम बाजवा/इंस्टा)
-
‘बॉर्डर २’ चे दिग्दर्शन अनुराग सिंग यांनी केले आहे आणि भूषण कुमार, कृष्ण कुमार, जेपी दत्ता आणि निधी दत्ता यांनी निर्मिती केली आहे. हा चित्रपट २२ जानेवारी २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. (सर्व फोटो साभार- सोनम बाजवा इन्स्टाग्राम) हेहे पाहा- Photos : सोनाली पाटीलचं भर पावसामध्ये रोमँटिक फोटोशूट, साडी लूकमधले सुंदर फोटो व्हायरल…

बाबा वेंगांची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये जगावर मोठं संकट कोसळणार? AI वरील तर… खतरनाक भाकितं वाचून बसेल धक्का