-
यंदा गणेशोत्सवात अनेक मराठी सेलिब्रिटींनी कोकणदौरा केल्याचं पाहायला मिळालं.
-
‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतून घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री अनघा अतुल सुद्धा नुकतीच कोकणात गेली होती.
-
अनघा अतुल ही पंडित अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांची लेक आहे. ती नुकतीच रत्नागिरी फिरायला गेली होती.
-
यावेळी अनघाने गणपतीपुळे मंदिरात बाप्पाचं दर्शन घेतलं.
-
गणपतीपुळ्याच्या मंदिर परिसरातील अनेक फोटो अनघाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
अनघाने शेअर केलेल्या या फोटोंवर एक खास कमेंट करण्यात आली आहे. पहिल्याच फोटोमध्ये ती उंदीर मामाच्या कानात काहीतरी इच्छा मागत असल्याचं पाहायला मिळत आहे.
-
तिचा फोटो पाहून “उंदराच्या कानात काय सांगितलं?” असा प्रश्न तिला एकाने विचारला. यावर तिने “मला लवकर रिप्लाय करण्याची शक्ती दे” असं हटके उत्तर दिलं आहे.
-
याशिवाय अनघाच्या अन्य चाहत्यांनी “गणपती बाप्पा तुझ्या सगळ्या मनोकामना पूर्ण करेल” असंही कमेंट्समध्ये म्हटलं आहे. बाप्पाचं दर्शन घेताना अनघाने पारंपरिक लूक केल्याचं पाहायला मिळालं.
-
अनघाचे हे फोटो सर्वांच्या पसंतीस उतरले आहेत. ( फोटो सौजन्य : अनघा अतुल इन्स्टाग्राम )

Nepal Gen Z Protest : माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळलं! नेपाळमध्ये ‘जेन-झी’ आंदोलकांचा हिंसाचार