-
‘झी मराठी’च्या ‘पारू’ मालिकेत अभिनेत्री शरयू सोनावणे मुख्य भूमिका साकारत आहे. या मालिकेत लवकरच प्रेक्षकांना एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळेल. आदित्य-पारूच्या लग्नाचं सत्य अखेर अहिल्यादेवीसमोर उघड होणार आहे.
-
पण, तुम्हाला माहितीये का? शरयू सोनावणेने तिचं खऱ्या आयुष्यातील लग्न सुद्धा वर्षभराने प्रेक्षकांसमोर जाहीर केलं होतं.
-
यामागचा किस्सा शरयूने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत सांगितला होता. यावेळी अभिनेत्रीने तिचं लग्न लपवण्यामागचं कारण देखील चाहत्यांना सांगितलं होतं.
-
अभिनेत्री शरयू सोनावणेने २०२३ मध्ये जयंत लाडेशी लग्नगाठ बांधली. हे लग्न तिने वर्षभर सर्वांपासून लपवून ठेवलं होतं.
-
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी तिने लग्न केल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे चाहत्यांना सुखद धक्का बसला होता. पण, शरयूने असा निर्णय का घेतला होता याबाबत तिने स्वत: खुलासा केला होता.
-
शरयू म्हणते, “लग्न लपवून ठेवण्यामागे असा काही वेगळा विचार वगैरे नव्हता. पण, माझी तेव्हा एक मालिका सुरू होती. त्यामुळे उगाच माझ्या मनात विचार येऊन गेला की, मालिका सुरू आहे आणि अचानक मी लग्न केलं होतं. तर प्रेक्षक माझं लग्न स्वीकारतील की नाही याशिवाय कुटुंबाने निर्णय घेतला होता की, आम्ही लगेच नाही तर थोड्या काळानंतर लग्न जाहीर करू.”
-
“त्यानंतर लग्न जाहीर करण्यासाठी आम्हाला खास दिवस मिळत नव्हता. मग वर्षभराने आमच्या लग्नाचा वाढदिवस जवळ आला. त्यावेळी असं ठरवलं की, आपण लग्नाच्या वाढदिवशी लग्न केल्याचं जाहीर करूयात. मग आम्ही लग्नाचे फोटो शेअर केले. सगळे लोक लग्न झाल्यावर लगेच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करतात म्हटलं आपण काहीतरी वेगळं करुयात” असं शरयूने सांगितलं होतं.
-
शरयू सोनावणेचा नवरा जयंत लाडे मराठी सिनेसृष्टीत सक्रिय असून तो एक फिल्ममेकर, निर्माता आहे.
-
उमेश कामत, पुष्कर श्रोत्री आणि स्पृहा जोशी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘अ पेईंग घोस्ट’ चित्रपटाच्या निर्मातीची धुरा जयंतने सांभाळली होती. याशिवाय ‘सूर सपाटा’ या चित्रपटाची निर्मिती देखील त्याने केली होती. यामध्ये शरयू महत्त्वाच्या भूमिकेत झळकली होती. ( सर्व फोटो सौजन्य : शरयू सोनावणे इन्स्टाग्राम )

आता काय जीवच घेणार का? महिलांनो बाजारातून भाजी घेताना सावधान; शेतातला VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल