-
नेटफ्लिक्सवर ट्रेंडिंगमध्ये आहेत हे १० चित्रपट
सैय्यारा
अहान पांडे आणि अनित पद्ढा यांचा ‘सैय्यारा’ हा चित्रपट नुकताच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. हा सिनेमा प्रदर्शित होताच टॉप १० मध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही चांगला व्यवसाय केला होता. आता ओटीटी प्रेक्षकांनाही चित्रपट आवडू लागला आहे. (Photo: Still from film) -
इन्स्पेक्टर झेंडे
मनोज बाजपेयीचा ‘इन्स्पेक्टर झेंडे’ हा चित्रपट या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. हा चित्रपट खूप पसंत केला जात आहे. मनोज बाजपेयी या चित्रपटात पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात मराठी कलाकारांची फौज पाहायला मिळत आहे. (Photo: Still from film) -
द मटेरियलिस्ट्स
नेटफ्लिक्सवरील ट्रेंडिंग चित्रपटांच्या यादीत अमेरिकन रोमँटिक चित्रपट ‘द मटेरियलिस्ट्स’ तिसऱ्या क्रमांकावर आहे. या चित्रपटात डकोटा जॉन्सन, ख्रिस इव्हान्स आणि पेड्रो पास्कल मुख्य भूमिकेत आहेत. (Photo: Still from film) -
किंग्डम
चौथ्या क्रमांकावर विजय देवरकोंडा स्टारर ‘किंग्डम’ आहे. हा एका गुप्तहेरावर आधारित तेलुगू अॅक्शन ड्रामा चित्रपट आहे. हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर आता नेटफ्लिक्सवर धुमाकूळ घालत आहे. (Photo: Still from film) -
मरीसन
या यादीत पाचव्या क्रमांकावर फहाद फासिल आणि वादिवेलु यांचा सस्पेन्सने भरलेला ‘मरीसन’ हा चित्रपट आहे. हा चित्रपट गेल्या काही काळापासून नेटफ्लिक्सवर ट्रेंड करत आहे. प्रेक्षकांना चित्रपटाची कथा आणि कलाकारांचा अभिनय आवडला आहे. (Photo: Still from film) -
मेट्रो इन दिनो
अनुराग बसू दिग्दर्शित ‘मेट्रो’ हा चित्रपट सध्या या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. या चित्रपटात आदित्य रॉय कपूर, सारा अली खान, अली फजल, फातिमा सना शेख, पंकज त्रिपाठी, कोंकणा सेन शर्मा, अनुपम खेर, नीना गुप्ता यांसारखे कलाकार आहेत. प्रेक्षकांना हा भावनिक प्रवास आवडतोय. (Photo: Still from film) -
तेहरान
या यादीत जॉन अब्राहमचा ‘तेहरान’ हा चित्रपट सातव्या क्रमांकावर आहे. ही एका गुप्तहेराची कथा आहे. चित्रपटात जबरदस्त अॅक्शन आहे जी लोकांना आवडली आहे. हा चित्रपट अरुण गोपालन यांनी दिग्दर्शित केला आहे. (Photo: Still from film) -
कराटे किड लेजेंड्स
आठव्या क्रमांकावर, अमेरिकन मार्शल आर्ट्स ड्रामा चित्रपट कराटे किड: लेजेंड्स हा मुलांच्या सर्वात आवडत्या चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेता जॅकी चॅन आणि राल्फ मॅकियो मुख्य भूमिकेत आहेत. नेटफ्लिक्सवर या चित्रपटाला पसंती मिळत आहे. (Photo: Still from film) -
माँ
या यादीत काजोलचा ‘माँ’ हा चित्रपट नवव्या क्रमांकावर आहे. हा पौराणिक नाट्यमय चित्रपट नेटफ्लिक्सवर ट्रेंड करत आहे. या हॉरर चित्रपटाला लोकांची पसंती मिळत आहे (Photo: Still from film) -
फॉल फॉर मी
दहाव्या क्रमांकावर शेरी हॉर्मन दिग्दर्शित आणि स्टेफनी सिझकोल्ट यांनी लिहिलेला जर्मन चित्रपट ‘फॉल फॉर मी’ आहे. या चित्रपटात स्वेन्जा जंग आणि थियो ट्रेब्स यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. (Photo: Still from film)

IND vs PAK LIVE, Asia Cup 2025: पाकिस्तानने टॉस जिंकला, बॅटिंगचा निर्णय