-
सोशल मीडियावर कोणता ट्रेंड कधी भाव खाऊन जाईल काही सांगताच येत नाही. गेल्या काही वर्षांत अनेक गोष्टी ट्रेंडमध्ये येतात व प्रचंड व्हायरल होतात. अलिकडे मात्र एआय तंत्र वापरून कायच्या काय फोटो तयार करणारा ट्रेंड तयार लोकप्रिय झाला आहे. यातच भर घातलीये ती म्हणजे गुगलच्या जेमिनी एआयने. सध्या सर्वत्र जेमिनी एआयमार्फत रेड साडीत फोटो क्रिएट करण्याचा ट्रेंड आला आहे. या ट्रेंडने सर्वसामान्य ते अभिनेत्री, गायिका, क्रिकेटर्सनाही वेड लावले आहे. मराठी सिनेविश्वातील टॉप अभिनेत्रींनीही त्यांचे फोटो तयार करत सोशल मीडियावर चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
-
अभिनेत्री अमृता खानविलकर
लाल साडीमधले २ फोटो अमृताने शेअर केले आहेत. -
या फोटोंमध्ये तिने पातळ लाल रंगाची प्लेन साडी नेसलेली दिसले आहे. मोकळे केस व केसांत गजराही दिसत आहे. तिचे हे फोटो खरोखरचेच वाटत आहेत.
-
प्रसिद्ध गायिका प्रियांका बर्वेनेही या ट्रेंडमध्ये तिचे फोटो शेअर केले आहेत.
-
पांढऱ्या रंगाची व लाल रंगाची अशा दोन साड्यांमध्ये प्रियांकाही खूपच सुंदर दिसते आहे.
-
अभिनेत्री आश्विनी कासारने तिचा फोटो शेअर करत कॅप्शन लिहिलं की “Not Gemini but FoMo makes me post this”.
-
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अमृता धोंगडेनेही तिचे या ट्रेंडमधले काही फोटो पोस्ट केले आहेत.
-
अमृता या फोटोंमध्ये खूपच गोड दिसत आहे. “going with trend” असं कॅप्शन तिने यावेळी दिलं आहे.
-
‘जारण’ फेम अनिता दातेनेही या ट्रेंडमधला फोटो “hold on to whatever keeps you happy” या कॅप्शनने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
-
ट्रेंड लूकमध्ये अभिनेत्री अक्षया गुरव
-
अभिनेत्री गौरी कुलकर्णीनेही दोन फोटो शेअर केले आहेत.
-
तिच्या फॅन अकाऊंटवरून हा फोटो शेअर करण्यात आला आहे.
-
अभिनेत्री मयुरी कापडणेने “Trends may fade, but the vibe is all mine” असे कॅप्शन देत तिचे फोटो शेअर केले आहेत.
-
“Gemini का काहीतरी म्हणे..”, असं सांगत अभिनेत्री साक्षी गांधीने तिचा सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केलाय.
-
अभिनेत्री स्वाती लिमयेनेही तिचे फोटो शेअर करताना “My birth sign is Gemini + AI” असं कॅप्शन दिलं आहे.
-
मराठी अभिनेत्री कुंजिका काळविंटनेही तिचे या ट्रेंडमधले ४ फोटो शेअर केले आहेत.
-
“Following the trend with my favourite lady” असं फोटो कॅप्शन तिने दिलं आहे. दरम्यान, या फोटोंमध्ये सगळ्याच अभिनेत्री अतिशय मोहक दिसत आहेत. त्यामुळे चाहतेही या पोस्ट्सवर विविध प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. (सर्व फोटो साभार- सोशल मीडिया) हेही पाहा- Mumbai Rain Updates: मुंबईत काही ठिकाणी मुसळधार; वरळीत रस्त्यावर साचलं पाणी, लोकल सेवाही विस्कळीत…

कधीच गॅस होणार नाही, पोटात कुजलेली सगळी घाण येईल बाहेर; आठवड्यातून एकदा फक्त ‘ही’ फळं खा