-
रचित सिंग कोण आहे: बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी ही इंडस्ट्रीतील सर्वात हॉट स्टार्सपैकी एक आहे. तिने तिच्या कारकिर्दीत अनेक चित्रपट केले आहेत आणि आता ती तिच्या आगामी ‘बयान’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. (Photo: Huma Qureshi/Instagram)
-
तिच्या या चित्रपटाचा प्रीमियर यंदाच्या टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात संपन्न झाला. दरम्यान, आता अभिनेत्रीबद्दल बातम्या येत आहेत की तिने तिचा दीर्घकाळाचा प्रियकर रचित सिंगशी लग्न केले आहे. (Photo: Huma Qureshi/Instagram)
-
हुमा आणि रचितने साखरपुडा उरकला असल्याचे वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिले आहे. या दोघांची कॉमन फ्रेंड गायिका आकासा सिंगने दोघांचा एक खास फोटो इन्स्टा स्टोरीवर शेअर केल्यानंतर या चर्चांना आणखी जोर मिळत आहे. (Photo: Huma Qureshi/Instagram)
-
हा फोटो शेअर करताना आकासाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “हुमा, स्वर्गाचा छोटासा एक तुकडा मिळाल्याबद्दल तुझे अभिनंदन.” दरम्यान, हुमा कुरेशी किंवा रचितने यावर अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. (Photo: Huma Qureshi/Instagram)
-
दरम्यान, यापूर्वी रचित सिंग आणि हुमा कुरेशी सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालच्या लग्नात एकत्र दिसले होते. रचित कोण आहे हे जाणून घेऊयातय…(Photo: Huma Qureshi/Instagram)
-
रचित हा व्यवसायाने अभिनय प्रशिक्षक आहे आणि त्याने आलिया भट्ट, रणवीर सिंग, विक्की कौशल, वरुण धवन, अनुष्का शर्मा आणि सैफ अली खान यासारख्या अनेक स्टार्सना ट्रेन केले आहे. (Photo: Huma Qureshi/Instagram)
-
एवढेच नाही तर रचित हा एक अभिनेता देखील आहे. त्याने वरुण सूद आणि रवीना टंडन स्टारर ‘कर्मा कॉलिंग’ या सिरीजमध्ये वेदांतची भूमिका साकारली होती, ज्याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. (Photo: Huma Qureshi/Instagram)
-
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ती लवकरच ‘जॉली एलएलबी ३’ मध्ये दिसणार आहे, जो १९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ती अर्शद वारसी, अक्षय कुमार आणि सौरभ शुक्ला यांच्याबरोबर स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. (Photo: Huma Qureshi/Instagram)

१९ सप्टेंबरपासून बुध-यमाचा राजयोग ‘या’ ३ राशींना देणार नुसता पैसा! अचानक आर्थिक लाभ तर करिअरमध्ये मिळेल मेहनतीचं फळ