-
‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘शिवा’, ‘नवरी मिळे हिटलरला’ या लोकप्रिय मालिकांनी गेल्या काही महिन्यांत प्रेक्षकांचा निरोप घेतल्याचं पाहायला मिळालं. आता या पाठोपाठ वाहिनीवरील आणखी एक मालिका सर्वांचा निरोप घेणार आहे. या मालिकेचं नाव आहे ‘लाखात एक आमचा दादा’.
-
‘लाखात एक आमचा दादा’ ही मालिका सध्या वाहिनीवर संध्याकाळी सहा वाजता प्रसारित केली जाते. शेवटचं शूटिंग पार पडल्यावर या मालिकेतील अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
-
‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेत सूर्या दादाच्या बहिणीची म्हणजेच राजश्री जगताप ( राजू ) ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री ईशा संजयने देखील इन्स्टाग्रामवर भावुक पोस्ट शेअर करत भूमिकेचा निरोप घेतला आहे.
-
राजश्री जगताप या भूमिकेमुळे ईशा घराघरांत पोहोचली. हे तिचं मालिकाविश्वातील पहिलंच काम होतं. मालिकेच्या सेटवर प्रत्येकाशी ईशाचं खूप छान बॉण्डिंग होतं.
-
ईशा भावना व्यक्त करत लिहिते, “निःस्वार्थी आणि निरपेक्ष प्रेम… संयम, कष्ट करण्याची अमाप ताकद आणि बेधडकपणा मला राजश्रीने शिकवला. खूप काही लिहायचं आहे पण डोळ्यातलं पाणी लिहू देत नाहीये…”
-
“कृष्णामातेचा आशीर्वाद पाठीशी घेऊन, आठवणींची ओंजळ भरून, कमाल अनुभव डोळ्यात साठवून पुढच्या प्रवासाला निघाले आहे. असंच प्रेम कायम असूदेत…लवकरच तुमच्या भेटीला पुन्हा येईन” असं ईशाने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
-
ईशाने या पोस्टसह ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेच्या सेटवरचे सुंदर फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. यामध्ये मालिकेच्या सेटची संपूर्ण झलक पाहायला मिळत आहे.
-
‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेचं शूटिंग मुंबई-पुण्यात नव्हे तर सातारा-वाई याठिकाणी व्हायचं.
-
ईशाने शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत तिला इंडस्ट्रीमधील पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ( सर्व फोटो सौजन्य : अभिनेत्री ईशा संजय इन्स्टाग्राम )

“निलेश साबळेसाठी देवाकडे प्रार्थना करतो”, भाऊ कदम यांचं भावनिक विधान; म्हणाले, “त्याची काळजी…”