-
‘देवमाणूस’ या मालिकेमुळे अभिनेता किरण गायकवाड घराघरांत लोकप्रिय झाला. वैयक्तिक आयुष्यात किरणने गेल्यावर्षाच्या अखेरीस लोकप्रिय अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरशी लग्न केलं.
-
किरण आणि वैष्णवी यांनी ‘देवमाणूस २’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं. याचवेळी दोघांची पहिली भेट झाली होती.
-
वैष्णवीने आतापर्यंत ‘देवमाणूस २’, ‘तिकळी’, ‘तू चाल पुढं’ या मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. आता वैष्णवी लवकरच ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत झळकणार आहे. या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
-
अभिनेता अक्षय केळकरची प्रमुख भूमिका असलेल्या ‘काजळमाया’ मालिकेत वैष्णवी झळकणार आहे.
-
‘काजळमाया’च्या निमित्ताने रुची जाईल मालिकाविश्वात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. ती यामध्ये ‘पर्णिका’ नावाच्या चेटकीणीची भूमिका साकारेल.
-
सध्या सर्वत्र ‘काजळमाया’ मालिकेची चर्चा सुरू आहे. ही मालिका २७ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
‘काजळमाया’ येत्या २७ ऑक्टोबरपासून रात्री उशिराच्या स्लॉटला म्हणजेच ११ वाजता प्रसारित केली जाईल. बायकोच्या नव्या मालिकेच्या प्रोमोवर किरण गायकवाडने सुद्धा खास कमेंट केली आहे.
-
‘काजळमाया’च्या प्रोमोवर ‘कमाल’ अशी कमेंट करत किरणने पुढे रेड हार्ट इमोजी दिले आहेत.
-
किरणने या नव्या मालिकेसाठी बायकोला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. आता या हॉरर मालिकेला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ( सर्व फोटो सौजन्य : वैष्णवी कल्याणकर व स्टार प्रवाह वाहिनी इन्स्टाग्राम )

दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत ‘या’ ४ राशींच्या घरांमध्ये पैशांचा पूर येईल; मंगळ आणि बुध ग्रहाच्या कृपेमुळे होणार कोट्यधीश