-
नुकताच झी मराठी अवॉर्ड्स २०२५ हा सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.
-
या सोहळ्याची सुरुवात झाली ती रेड कार्पेटवरील कलाकारांचा ग्लॅमरस लूक, उत्साह आणि जल्लोष.
-
मराठी कलाकारांनी रेड कार्पेटसाठी स्टायलिश पोशाख परिधान केले होते.
-
‘तारिणी’, ‘पारू’, ‘कमळी’, ‘सावळ्याची जणू सावली’, ‘वीण दोघांतली ही तुटेना’, ‘तुला जपणार आहे’, ‘लाखात एक आमचा दादा’ आणि ‘चला हवा येऊ द्या’ या मालिकेती कलाकारांनी वेगळ्या अंदाजात रेड कार्पेट एंट्री घेतली.
-
तारिणी केदार, पारू आदित्य, हृषी कमळी, सावली सारंग, सिद्धू भावना, जयंत जान्हवी, मीरा अथर्व, सूर्या तुळजा, श्रीनिवास लक्ष्मी यांचा सहज भाव, त्यांच्या नजरेतली चमक आणि चाहत्यांबरोबर जोडलेले हृदयस्पर्शी नातं पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
-
यंदाच्या रेड कार्पेटवर झी मराठीच्या ज्येष्ठ कलाकारांची उपस्थिती सर्वात भावनिक ठरली.
-
राजवडे आजी, सुरू आजी, आप्पा, गाडे पाटील आजी आणि अन्नपूर्णा आजी अशा अनुभवी चेहऱ्यांनी वातावरणात एक वेगळीच मज्जा आणली.
-
प्रत्येक कलाकाराचे रेड कार्पेटवरील आगमन म्हणजे एक छोटा सोहळाच वाटत होता.
-
झी मराठी अवॉर्ड्स २०२५चा रेड कार्पेट सोहळा भावना, आठवणी आणि प्रेमाचा उत्सव होता.
-
आपल्या मालिकांमधील कलाकार एकत्र दिसले, त्यांच्या हसऱ्या चेहऱ्यांनी, एकमेकांना दिलेल्या मिठ्यांनी, आणि प्रेक्षकांबरोबर घालवलेल्या क्षणांनी हे स्पष्ट केलं की झी मराठीचं कुटुंब खरंच एकसंध आहे.
-
हा सोहळा प्रेक्षकांना ११ आणि १२ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७ वाजता झी मराठीवर पाहाता येणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : झी मराठी/इन्स्टाग्राम)

अभिनेत्री लग्नानंतर सात वर्षांनी झाली आई, जुळ्या मुलींना दिला जन्म; लेकी २ महिन्यांच्या झाल्यावर शेअर केली पोस्ट