-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून ‘वाह दादा वाह’ म्हणत महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी.
-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सूत्रसंचालनाच्या आपल्या वेगळ्या अंदाजाने प्राजक्ताने सर्वांच्या मनात आपलं घर केलं आहे.
-
मात्र, या शोच्या सूत्रसंचालनासाठी आधी प्राजक्ताने नकार दिला होता आणि याबद्दल स्वत: प्राजक्तानेच सांगितलं आहे.
-
प्राजक्ता म्हणाली, “सुरूवातीला एक सीझन करू आणि दुसऱ्या सीझनसाठी नकार देऊ असं ठरवलेलं. त्यामुळे मी तेवढंच करणार होते.”
-
पुढे ती सांगते, “मग दुसऱ्या सीझनवेळी मला प्रसाद ओक म्हणाले, “तू दुसरा सीझनही कर. नाहीतर लोकांना वाटेल, तुला काढलं आहे.”
-
यानंतर ती म्हणते, “पुढे काहीना काही गोष्टी येत राहिल्या आणि शो चालू राहिला. नंतर लॉकडाऊनमध्ये तर फक्त हाच शो सुरू होता.”
-
यापुढे प्राजक्ता असं म्हणाली, “‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोमुळे माझा सूत्रसंचालनकडे बघण्याचा दृष्टीकोनच बदलला आहे.”
-
यानंतर प्राजक्ता सांगते, “या शोमुळे लोकांच्या आयुष्यात सकारात्मकता आणि आनंद येत आहे. त्यामुळे याला गालबोट लागता कामा नये असं मला वाटलं.”
-
दरम्यान, सोनी मराठीच्या MHJ Unplugged या गप्पांच्या कार्यक्रमात प्राजक्ताने तिच्या सूत्रसंचालनाच्या अनुभवाबद्दल सांगितलं आहे. (फोटो : इन्स्टाग्राम)

Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल