-
झी मराठीच्या ‘तुला जपणार आहे’ मालिकेत अनन्या म्हणून प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री तनिष्का विशे नुकतीच अवॉर्ड नॉमिनेशन सोहळ्यात अवतरली.
-
या खास प्रसंगासाठी तिने निवडलेला नारिंगी रंगाचा ट्रॅडिशनल फ्युजन गाऊन तिच्या लूकला वेगळं सौंदर्य देत होता.
-
या ड्रेसमध्ये झळकणारा सिल्व्हर जरीचा बेल्ट आणि बारीक नक्षीकाम तिच्या स्टाईलला राजेशाही टच देत होता.
-
तनिष्कानं या वेळी पारंपरिकतेसोबत आधुनिकतेचं सुंदर मिश्रण साकारलं होतं आणि तिचा लूक अत्यंत एलिगंट भासत होता.
-
तिच्या गाऊनचा ऑफ-शोल्डर कट आणि परिपूर्ण फिटिंग तिच्या आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्त्वाला अधोरेखित करीत होता.
-
या संपूर्ण लूकला पूरक ठरत होते तिचे गोल्ड टोनचे कानातले आणि हातातील ब्रेसलेट्स, ज्यांनी लूकमध्ये सोज्वळता आणली.
-
साध्या, पण आकर्षक मेकअपने तनिष्काचा चेहरा खुलून दिसत होता; तर लहानसा काळा बिंदू तिच्या लूकला मराठमोळा स्पर्श देत होता.
-
झी मराठी अवॉर्ड्स नॉमिनेशन सोहळ्यात तिच्या उपस्थितीनं कार्यक्रमाला ग्लॅमरस टच मिळाला.
-
(सर्व फोटो सौजन्य : तनिष्का विशे/इन्स्टाग्राम)

Khawaja Asif : पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांची भारताला पुन्हा धमकी; म्हणाले, ‘आता युद्ध झालं तर भारत…’