-    लोकप्रिय मराठी अभिनेत्री मीरा जोशीनं दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर मुंबईत नवीन घर घेतलं. 
-    दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर या नवीन घरात तिने प्रवेश केला असून याचे फोटो तिने शेअर केले आहेत. 
-    नवीन घर घेताच मीराने तिच्या आनंदी भावना सोशल मीडियाद्वारे व्यक्त केल्या आहेत. 
-    मीरा म्हणते, “मुंबईत फ्लॅट असावा, हे स्वप्न मी गेली १५ वर्ष उराशी बाळगून होते. कारण- हीच आता माझी कर्मभूमी आहे.” 
-    “अनेक वर्ष भाड्याच्या घरात राहिले. कोणत्याच घरमालकानं कधी ‘खाली करा’ असं सांगितलं नाही.” 
-    “माझ्या दादाच्या योग्य सल्ल्यानं पै आणि पै अगदी योग्य ठिकाणी बचत केली होती.” 
-    “या क्षेत्रामधील लोकांना बँका लोन देत नाहीत. कारण आमचं ठोस असं उत्पन्न नसतं. मग बाबांनी बँकेचं होम लोन करून दिलं आणि माझं घर झालं.” 
-    “या सगळ्यात माझ्या आईची खूप मदत झाली. आईमुळेच रत्नागिरीतील एक मुलगी स्वप्नांच्या शहरात मोठी स्वप्नं पाहू शकली.” 
-    दरम्यान, मीराने खरेदी केलेल्या या नव्या घराबद्दल मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. (फोटो : इन्स्टाग्राम) 
 
  कधीच गॅस होणार नाही, पोटात कुजलेली सगळी घाण येईल बाहेर; आठवड्यातून एकदा फक्त ‘या’ भाजीचा ज्यूस प्या 
   
  
  
  
  
   
   
   
   
   
  