-
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातून प्रसिद्धी झोतात आलेला स्पर्धक म्हणजे सूरज चव्हाण. सूरज या पर्वाचा विजेताही झाला होता.
-
सूरज सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. सोशल मीडियावर तो त्याचे अनेक फोटो-व्हिडीओ शेअर करीत असतो. या व्हिडीओला चाहत्यांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळतो.
-
अशातच गेल्या काही दिवसांपासून सूरजच्या लग्नाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. याबद्दल अंकिता वालावलकरने खास पोस्ट शेअर करीत बातमी दिली होती.
-
आता सूरजच्या होणाऱ्या बायकोचं नावदेखील समोर आलं आहे. धनंजय पोवार म्हणजेच सर्वांच्या लाडक्या डीपीदादानं सूरजची होणाऱ्या बायकोचं नाव जाहीर केलं आहे.
-
सूरजनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि या व्हिडीओवर धनंजय पोवारनं कमेंट करीत सूरजच्या बायकोचं नाव सांगितलं.
-
धनंजय म्हणतो, “मला माहित आहे. मी बघितलं आहे. थांब तुझ्या छकुलीचा फोटो टाकतो. सूरजच्या होणाऱ्या बायकोचं नाव ‘छकुली’ असं आहे.”
-
दरम्यान, सूरजच्या लग्नाबबत अद्याप काही माहिती समोर आलेली नाही. मात्र त्याचे अनेक चाहते या लग्नासाठी उत्सुक आहेत.
-
‘बिग बॉस’ मराठीनंतर सूरज मराठी सिनेमामधून प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमाचं नाव ‘झापुक झुपूक’ असं होतं. (फोटो : इन्स्टाग्राम)
-
दिग्दर्शक केदार शिंदे यांनी ‘झापुक झुपूक’ या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. या सिनेमातल्या सूरजच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक झालं होतं.

प्रसिद्ध अभिनेत्याने घटस्फोटानंतर ९ वर्षांनी केला साखरपुडा; अमृता खानविलकर कमेंट करत म्हणाली…