-
‘झी मराठी वाहिनी’चा पुरस्कार सोहळा ११ आणि १२ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.
-
पुरस्कार सोहळे असले की विविध कलाकृती, डान्स, विनोद, अनेक गमती जमती पाहायला मिळतात.
-
चित्रपट पुरस्कार सोहळ्यांप्रमाणेच टीव्हीवरील प्रत्येक वाहिनी दरवर्षी पुरस्कार सोहळ्यांचे आयोजन करत असते. विविध भूमिकांना, मालिकांना पुरस्कार दिले जातात.
-
सर्वोत्कृष्ट मालिकापासून ते सर्वोत्कृष्ट नायिका कोणती, सर्वोत्कृष्ट कुटुंब, सर्वोत्कृष्ट खलनायक असे अनेक पुरस्कार दिले जातात. याबरोबरच, काही कलाकारांचा त्याच्या कामासाठी विशेष पुरस्कार देऊन गौरव केला जातो.
-
पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने कलाकार व्यक्त होतात.त्यांच्या मनातील भावना सांगतात. मनातील हळवा कोपरा सर्वांसमोर उघड करतात.
-
याबरोबरच, पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने कलाकार विविध पोशाख परिधान करतात.
-
काही कलाकार पारंपारिक कपड्यांमध्ये दिसतात. तर काही मॉडर्न कपड्यांमध्ये दिसतात. कलाकारांचे हे लूक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतात.
-
आता झी मराठी वाहिनीच्या नायिकादेखील विविध पोशाखांमध्ये तयार झाल्या आहेत.
-
यामध्ये अहिल्यादेवी, जान्हवी, जयंती, माधुरी, सई आणि इतर भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दिसत आहेत. (फोटो सौजन्य:झी मराठी इन्स्टाग्राम)

मराठी अभिनेत्याने गायक सुदेश भोसलेंच्या लेकीशी केला साखरपुडा; तेजश्री प्रधान म्हणाली, “मी तुझ्यासाठी खूप…”