-
सोशल मीडियावर लोकप्रिय रीलस्टार तन्मय पाटेकरने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील मोठा निर्णय शेअर केला आहे.
-
त्याने इन्स्टाग्रामवर एक सुंदर फोटो शेअर करीत ‘ठरलंय बरं का ॥ शुभविवाह लवकरच ॥’ असे लिहून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली.
-
तन्मयच्या होणाऱ्या पत्नीचे नाव निमिषा असे आहे
-
फोटोमध्ये तन्मयने निळा कुर्ता परिधान केला आहे; तर निमिषा ही पिवळ्या साडीत दिसत आहे.
-
दोघांच्या चेहऱ्यावरचे हसू आणि हातात हात घेऊन चालण्याची स्टाईल नेटिझन्सना भावली आहे.
-
तन्मय आपल्या रील्समधून सकारात्मकता, आत्मविश्वास आणि जीवनातील प्रेरणादायी विचार मांडतो.
-
तो प्रामुख्याने दैनंदिन आयुष्यातील हलके फुलके प्रसंग, जोडप्यांमधील संवाद यांवर मराठमोळा टच असलेल्या रील्स तयार करतो.
-
सध्या त्याच्या या पोस्टने चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण केली असून ‘#Nimay’ हा हॅशटॅग चर्चेत आला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : तन्मय पाटेकर/इन्स्टाग्राम)

“अजय देवगण १८ वर्षांपासून माझ्याशी बोलत नाही, माझ्या करिअरमधील सर्वात वाईट…”