-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या केनियामध्ये सुट्यांचा आनंद घेत आहे.
-
सोनालीने सोशल मीडियावर तिच्या या Sensory Garden Kenya मधील काही खास छायाचित्रे शेअर केली आहेत.
-
या फोटोंमध्ये ती चहाच्या मळ्यात फिरताना आणि चहा तोडणीचा अनुभव घेताना दिसते.
-
सोनालीने या प्रसंगी हलक्या आणि आरामदायी कपड्यांमध्ये अतिशय मोहक लूक साधला आहे.
-
सोनालीसोबत तिचा पती दिसत असून, त्याने कॅज्युअल शॉर्ट आणि टी-शर्ट असा आरामदायी पेहराव केला आहे.
-
दोघेही हिरवळीने नटलेल्या बागेत चहाचा आस्वाद घेत आणि वेळ घालवत असल्याचे फोटोंतून दिसतेय.
-
या फोटोमधून दोघांची जवळीक आणि प्रवासाची आवड स्पष्टपणे जाणवते.
-
सोनालीने तिच्या पोस्टला Trumpeting around in @sensorygardenkenya अशी कॅप्शन दिली असून, निसर्गात रमलेली अभिनेत्री या फोटोंमधून चाहत्यांच्या मनात पुन्हा एकदा घर करून गेली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सोनाली कुलकर्णी/इन्स्टाग्राम)

IND vs AUS, Match Timings: भारत- ऑस्ट्रेलिया वनडे सामना किती वाजता सुरू होणार?