-
रेश्मा शिंदेला मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं. तिने आजवर अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.
-
रेश्मा शिंदेचा विवाहसोहळा २९ नोव्हेंबर २०२४ रोजी पार पडला. अभिनेत्रीच्या नवऱ्याचं नाव पवन असून तो साऊथ इंडियन आहे. यंदा अभिनेत्रीने लग्नानंतरची पहिली दिवाळी साजरी केली आहे.
-
रेश्माने दिवाळी पाडव्यानिमित्त सोशल मीडियावर सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये अभिनेत्री पतीला उटणं लावत असल्याचं पाहायला मिळत आहे.
-
रेश्माचा पती पवन हा आयटी प्रोफेशनमध्ये कार्यरत आहे.
-
“गेली सात ते आठ वर्षे पवन युकेमध्ये काम करत होता. पण, त्याने भारतात परतण्याचा निर्णय माझ्यासाठी घेतलाय. माझ्या कामाचं स्वरुप पाहता मला बाहेरगावी जाणं शक्य नव्हतं” असं रेश्माने एका मुलाखतीत सांगितलं होतं.
-
पवन रेश्मासह सगळे मराठी सण मोठ्या आनंदाने साजरे करतो.
-
रेश्माने शेअर केलेल्या फोटोंवर तितीक्षा तावडे, अभिज्ञा भावे, सुयश टिळक, ऋतुजा कुलकर्णी यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
-
दरम्यान, रेश्मा शिंदेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर सध्या ती ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत काम करत आहे. या मालिकेला प्रेक्षकांचा सुद्धा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ( सर्व फोटो सौजन्य : रेश्मा शिंदे इन्स्टाग्राम )

बापरे! २०२६ मध्ये सोन्याचा दर किती असेल? सोन्याच्या किंमतीबाबत बाबा वेंगाने केलेले भाकित जाणून धक्का बसेल