-
‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेमुळे अभिनेत्री रेश्मा शिंदे सध्या सर्वत्र चर्चेत आहे. यामध्ये ती जानकी ही मुख्य भूमिका साकारत आहे.
-
यंदा रेश्मा शिंदेने लग्नानंतर तिची पहिली दिवाळी साजरी केली. यानिमित्ताने अभिनेत्रीच्या सासरच्या कुटुंबीयांची झलक चाहत्यांना पाहायला मिळाली.
-
रेश्मा शिंदेचा पती पवन हा साऊथ इंडियन असून, अभिनेत्रीचं सासर बंगळुरुला आहे.
-
अभिनेत्री दिवाळी साजरी करण्यासाठी खास तिच्या सासरी पोहोचली होती. याचे सुंदर फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये रेश्माची नणंद, अभिनेत्रीचा चिमुकला पुतण्या, सासरेबुवा आणि अन्य कुटुंबीयांची झलक पाहायला मिळत आहे.
-
रेश्माची लग्नानंतर पहिली दिवाळी असल्याने तिच्या सासरी खास सेलिब्रेशन करण्यात आलं. रेश्मा व पवन या दोघांनी मिळून एकत्र फटाके सुद्धा फोडले.
-
दिवाळीनिमित्त रेश्माने सुंदर अशी कांजीवरम सिल्क साडी नेसली होती. सुंदर साडी, साऊथ इंडियन डिझाइन असलेलं मंगळसूत्र या लूकमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर होती.
-
“आमची पहिली दिवाळी” असं कॅप्शन देऊन रेश्माने या पोस्टमध्ये पवनला सुद्धा टॅग केलं आहे.
-
रेश्माने शेअर केलेल्या या फोटोंवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. रेश्मा आणि पवन यांच्या लग्नाला पुढच्या महिन्यात २९ नोव्हेंबरला १ वर्ष पूर्ण होणार आहे. ( सर्व फोटो सौजन्य : रेश्मा शिंदे इन्स्टाग्राम )
रात्री झोपण्याआधी गूळ आणि तूप नक्की खा; सकाळी परिणाम पाहून थक्क व्हाल, डॉक्टरांनी स्वत: दिली माहिती