-    मराठी टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री गिरिजा प्रभू सध्या ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ या मालिकेत कावेरी ही प्रमुख भूमिका साकारत आहे. 
-    नुकताच गिरिजाने शेअर केलेला हा खास मिरर सेल्फी सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाला आहे. 
-    या फोटोमध्ये ती निळ्या रंगाच्या पारंपरिक ड्रेसमध्ये दिसत असून, त्यावरील फुलांच्या भरतकामामुळे तिचा लूक आणखी खुलून दिसतो आहे. 
-    गळ्यातील लाल नेकलेस, हातातील लाल बांगड्या आणि हलका पण उठावदार मेकअप या सगळ्यामुळे गिरिजाचा पारंपरिक लूक अधिक उठून दिसतो. 
-    चाहत्यांना तिचा हसरा चेहरा आणि नैसर्गिक भाव विशेष आवडले असून, कमेंट सेक्शनमध्ये कौतुकाचा वर्षाव सुरू आहे. 
-    गिरिजाने हा लूक विशेषतः ‘आता होऊ दे धिंगाणा ४’ या स्टार प्रवाहवरील लोकप्रिय कार्यक्रमासाठी तयार केला आहे. 
-    सध्या गिरिजा प्रभू तिच्या अभिनयासोबतच स्टायलिश लूकसाठीही चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. 
-    (सर्व फोटो सौजन्य : गिरिजा प्रभू/इन्स्टाग्राम) 
 
  Diwali 2026 Date : २०२६ मध्ये तब्बल सात दिवस साजरा केला जाणार दिवाळसण, ‘या’ दिवशी असेल लक्ष्मीपूजन, भाऊबीज 
   
  
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  