-
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी लोणारीचा (Tejaswini Lonari) २६ ऑक्टोबर रोजी शिवसेना युवा नेते समाधान सरवणकर यांच्याबरोबर (Samadhan Sarvankar) साखरपुडा पार पडला.
-
समाधान सरवणकर हे शिवसेना (शिंदे गट) नेते सदा सरवणकर (Shiv Sena Leader Sada Sarvankar) यांचे पुत्र आहेत.
-
समाधान यांची बहीण प्रिया सरवणकर गुरव (Priya Sarvankar Gurav) यांनी तेजस्विनीबरोबरचा खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
-
या फोटोला प्रिया यांनी ‘मेरे भाई की दुल्हन…’ असे कॅप्शन दिले आहे.
-
प्रिया यांनी तेजस्विनी व समाधान यांच्या साखरपुड्यात गुलाबी रंगाची सुंदर पैठणी साडी नेसली होती.
-
तेजस्विनी व समाधान यांचा साखरपुडा मुंबईतील आलिशान हॉटेलमध्ये पार पडला होता.
-
विधानसभा निवडणुकीदरम्यान प्रिया सरवणकर एका जाहीर सभेतून अमित ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती.
-
या भाषणात प्रिया सरवणकर यांनी अमित ठाकरेंसह, आदित्य ठाकरे, ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत, माजी महपौर किशोरी पेडणेकर आणि मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर जोरदार टीका केली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : तेजस्विनी लोणारी व प्रिया सरवणकर/इन्स्टाग्राम)
अगं बाई! साडीतील काकूंचा ठुमका पाहून थक्क झाले नेटकरी; VIDEO पाहून म्हणाले “आंटी तर लहानपणी…..