-
स्टार प्रवाहवरील ‘अबोली’ या लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी अभिनेत्री म्हणजे गौरी कुलकर्णी.
-
गौरी कुलकर्णीची मुख्य भूमिका असलेल्या ‘अबोली’ या लोकप्रिय मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला.
-
२६ ऑक्टोबर, रविवार रोजी गौरी कुलकर्णीच्या ‘अबोली’ या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला.
-
मालिका संपताच गौरी कुलकर्णी थेट देवदर्शनाला गेली आहे, याचे खास फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले.
-
गौरी सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते, सोशल मीडियाद्वारे ती तिच्या दैनंदिन आयुष्यातील अनेक घडामोडी शेअर करत असते.
-
अशातच गौरीनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे देवदर्शनाचे काही खास क्षणही आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केले होते.
-
गौरी तिच्या काही मित्र आणि मैत्रीणींबरोबर देवदर्शनाला गेली होती. गुजरातमधील सोमनाथ मंदिर या ठिकाणी ती देवदर्शनाला गेली होती.
-
दरम्यान, ‘अबोली’ या मालिकेनं तब्बल चार वर्षे प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं. २३ नोव्हेंबर २०२१ रोजी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

महिनाभर दररोज दही खाल्ल्यानं काय होईल? डॉक्टरांनी सांगितलेले परिणाम ऐकून विश्वास बसणार नाही