-
मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने या नवीन फोटोशूटमध्ये पारंपरिक आणि सौंदर्यपूर्ण लूक सादर केला आहे. तिच्या चेहऱ्यावरचा मोहक भाव फोटोला उठाव देतो.
-
तिने परिधान केलेली जड ऑक्सिडाइज्ड नेकपीस स्टाईलला दमदार आणि ग्रामीण स्पर्श देणारी ठरते. तिच्या लूकचे मुख्य आकर्षण म्हणजे हा पारंपरिक दागिना.
-
हातांवर घातलेल्या काळ्या व चांदीच्या बांगड्या तिच्या संपूर्ण फोटोला एकसंधता देत आहेत. साधेपणा आणि देखणेपणा एकत्र येतो तिथे हा लूक झळकतो.
-
नथ आणि टिकली जोडीने प्राजक्ताने पूर्णतः पारंपरिक, ग्रामीण सौंदर्याची झलक दाखवली आहे. हा लूक तिच्या व्यक्तिमत्त्वावर खास उठून दिसतो.
-
हातावरच्या ‘asha’ या टॅटूनं फोटोला वैयक्तिक आणि कलात्मक स्पर्श दिला आहे. तिच्या व्यक्तिमत्त्वातील आत्मविश्वास या छोट्या तपशिलातून जाणवतो.
-
मंद उजेडात घेतलेल्या या फोटोमुळे दागिन्यांची पोत, चेहऱ्याच्या रेषा आणि तिच्या अभिव्यक्तीतील नाजूक तपशील खासपणे उभा राहतो.
-
प्राजक्ताच्या या फोटोशूटमध्ये ग्रामीण सौंदर्य, पारंपरिक स्टाइलिंग आणि आधुनिक फोटोग्राफीचा सुंदर मिलाफ दिसून येतो.
-
कॅमेरासमोर तिची सहजता, शांत भाव व कलात्मक पो,ज पाहता हा लूक तिच्या सर्वाधिक आकर्षक फोटोंपैकी एक मानला जाऊ शकतो.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता माळी/इन्स्टाग्राम)
तुम्ही कोणत्या वेळी शौचास जाता? यावरून कळेल तुमची पचनसंस्था किती निरोगी…