-
१. महाबळेश्वर – सह्य़ाद्रीच्या मुख्य रांगेवर, उंच जागी वसलेले हे गिरिस्थळ कायम थंडगार वातावरणासाठी प्रसिद्ध आहे.
-
२.. गणपतीपुळे – हे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. येथील गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे अशी मान्यता आहे. सह्याद्री पर्वतातील डोंगराळ भागात विराजलेली नैसर्गिक मूर्ती आणि जवळच पश्चिमेला अरबी समुद्र ह्यामुळे हे देऊळ आगळेवेगळे आहे
-
३. पाचगणी – महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्य़ातील महाबळेश्वरच्या बाजूस वसलेले असे अत्युत्तम थंड हवेचे ठिकाण म्हणजे पाचगणी. दोन दिवसांची सुट्टी घेऊन ताजेतवाने होण्यासाठी पाचगणी हे अगदी योग्य ठिकाण आहे.
-
४. अलिबाग – अलिबागला काही लोक मिनी गोवा म्हणतात. हे मुंबई, पुण्यापासून एक दिवसाच्या सहलीसाठी जवळचे ठिकाण आहे. हे इथल्या समुद्रकिनाऱ्यासाठी आणि सीफूडसाठी प्रसिद्ध आहे.
-
५. चिखलदरा – हे थंड हवेचे ठिकाण अमरावती जिल्ह्यात आहे. हे विदर्भाचे नंदनवन म्हणूनही प्रसिद्ध आहे.
-
६. गगनबावडा – सह्य़ाद्रीच्या धारेतून पुढे आलेल्या एका डोंगरावर हा गगनगड वसला आहे. समुद्रसपाटीपासून याची उंची आहे ६९१ मीटर. गगनबावडा हे गडाच्या पायथ्याचे गाव आहे.
-
७. भंडारदरा – हे स्थान रतनगड, अलंग-कुलंग, हरिश्चंद्रगड, भरवगड, घाटघर आणि महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसूबाई शिखराने वेढलेले आहे.
-
८. इगतपुरी – इगतपुरीत पाहण्यासारख्या जागा म्हणजे कुलंग,अलंग,मदनगड,कळसूबाई,रतनगड या उत्तुंग डोंगररांगा तसेच सांधन दरी,रंधा धबधबा या ठिकाणपासून जवळच आहे.कसारा घाटा जवळ भातसा रिव्ह्रर व्हैली,उंट दरी,पाच धबधबे,असे सुंदर ठिकाणे आहेत.
-
९. तोरणमाळ – हे नंदुरबार जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे. तोरणमाळ सातपुडा पर्वताच्या तिसर्या व चौथ्या रांगेत अक्राणी तालुक्यात वसलेले आहे.
-
१०. ताडोबा अंधारी-व्याघ्र प्रकल्प – ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प आहे. येथे वाघांची वस्ती आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यानात मुख्य आकर्षण जंगल सफारी आहे.

ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल