-
इंजिनिअर तरुणांसाठी एक चांगली बातमी आहे. उद्योग क्षेत्रातील नावाजलेली कंपनी लार्सन एंड टुब्रो (L&T ) पुढील वर्षात अर्थात २०२१ मध्ये जवळपास ११०० इंजिनिअर्सची भरती करणार आहे.
-
करोना महामारीच्या संकटामुळे लार्सन एंड टुब्रो (L&T ) कंपनीकडून ऑनलाइन भरती प्रक्रिया सुरू आहे.
-
लार्सन एंड टुब्रो कंपनीने ऑनलाइन भरती प्रक्रियेद्वारे आतापर्यंत २५० इंजिनिअर्सची भरती प्रक्रियाही पूर्ण केली आहे. या भरतीमध्ये आयआयटी मद्रास, आयआयटी गुवाहाटी, आयआयटी बॉम्बे, आयआयटी दिल्ली, आईआईटी रूडकी, आयआयटी खडगपुर, आयआयटी (आईएसएम) धनबाद, आयआयटी हैदराबाद आणि अन्य आयआयटी संस्थांमधून शिक्षण पूर्ण केलेल्या इंजिनिअर्सना प्राधान्य देण्यात आलं.
"पुढील वर्षी ११०० इंजिनिअर्सची भरती करण्याचा विचार असून, आतापर्यंत २५० जणांची भरती झाली आहे", अशी माहिती एल अँड टी (L&T) चे व्यवस्थापकीय संचालक एस. एन. सुब्रमण्यम यांनी दिली. -
"आम्ही तरुणांना केवळ नोकरीच देत नाही तर इथे आलेल्या इंजिनिअर्सना खूप काही शिकण्याची संधीही मिळते, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील कामांचा अनुभव मिळतो", असंही सुब्रमण्यम यांनी सांगितलं. दरम्यान, एल अँड टी (L&T) कंपनी दरवर्षी जवळपास ११०० फ्रेशर इंजिनिअर्सना संधी देत असते. यातील ९० टक्के आयआयटी, एनआयटी आणि अव्वल सरकारी इंजिनिअरिंग कॉलेजचे तरुण असतात.

‘बायकोला नाचताना पाहून पती लाजला…’, हळदीच्या कार्यक्रमातील VIDEO होतोय तुफान व्हायरल