-
Paytm देशातील सर्वात मोठा IPO आणणार आहे
-
बहुप्रतीक्षित ‘पेटीएम’च्या प्रारंभिक समभागांची विक्री ८ नोव्हेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे.
-
पेटीएमचा IPO १० नोव्हेंबर रोजी बंद होईल. त्यानंतर कंपनीने १८ नोव्हेंबर रोजी शेअर्सची यादी करण्याची योजना आखली आहे.
-
पेटीएमने आपल्या आयपीओचा आकार १८,३०० कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी ते १६,६०० कोटी रुपये होते.
-
IPO साठी किंमत श्रेणी म्हणजेच इश्यू किंमत २,०८० ते २,१५० रुपये प्रति शेअर ठेवण्यात आली आहे
-
पेटीएमच्या IPO मध्ये ८,३०० कोटींचे नवीन इक्विटी शेअर्स असतील.
-
तर भागधारकांद्वारे ऑफर फॉर सेल (OFS) चा आकार रु. १,७०० कोटींनी वाढवून १०,००० कोटी केला आहे.
-
कंपनीचे सर्वात मोठे शेअरहोल्डर असणाऱ्या अलीबाबा ग्रुपची कंपनी अँट फायनान्शियल आणि सॉफ्टबँकसह विद्यमान गुंतवणूकदारांनी कंपनीतील त्यांची बहुसंख्य हिस्सेदारी विकण्याचा निर्णय घेतला आहे.
-
पेटीएमचे संस्थापक आणि सीईओ विजय शेखर शर्मा गेल्या एक वर्षापासून महसूल वाढवण्यात आणि पेटीएमच्या सेवांवर कमाई करण्यात गुंतले आहेत.
-
स्टार्टअपने आपला व्यवसाय डिजिटल पेमेंटच्या पलीकडे बँकिंग, क्रेडिट कार्ड, वित्तीय सेवा, संपत्ती व्यवस्थापन आणि डिजिटल वॉलेटपर्यंत विस्तारला आहे.
-
Paytm ने PhonePe, Google Pay, Amazon Pay आणि WhatsApp Pay च्या आव्हानाचा यशस्वीपणे सामना केला आहे.
-
पेटीएमचे २० दशलक्षाहून अधिक व्यापारी भागीदार आहेत आणि त्याचे वापरकर्ते दर महिन्याला १.४ अब्जांचा व्यवहार करतात.
-
कोविड-१९ महामारीमुळे डिजिटल पेमेंटला लक्षणीय गती आली असे विजय शेखर शर्मा यांनी सांगितले आहे.
-
पेटीएम आयपीओ चालवणे शॉर्टलिस्ट केलेल्या बँकांमध्ये मॉर्गन स्टॅनले, सिटीग्रुप इंक आणि जेपी मॉर्गन चेस अँड कं. यांचा समाविष्ट आहेत. त्यापैकी मॉर्गन स्टॅनलेचा दावा सर्वात मजबूत आहे.
-
दरम्यान, पेटीएमच्या आयपीओची अनेक दिवसांपासून मार्केट वाट पाहत आहे. २०१० मध्ये कोल इंडियाच्या १५,२०० कोटी रुपयांच्या IPO नंतर हा देशातील सर्वात मोठा IPO असेल.

“हे आहे मराठी भाषेचं भविष्य” इंग्रजीत बोलणाऱ्या आईला चिमुकलीनं काय उत्तर दिलं एकदा ऐकाच; VIDEO पाहून सर्वानाचं वाटेल अभिमान