-
दरवर्षी १२ जुलै रोजी सर्वत्र कागदी पिशवी दिवस म्हणून साजरा केला जातो.
-
प्लास्टिकमुळे होणारे प्रदूषण आणि नैसर्गिक वातावरणास निर्माण होणार्या गंभीर धोक्याबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
-
१८५२ मध्ये अमेरिकन शोधक फ्रान्सिस वोले यांनी प्रथम कागदी पिशवी बनवायची मशीन तयार केली.
-
पुढे १८७१ मध्ये मार्गारेट ई. नाइटने आणखी एक मशीन बनविली जी फ्लॅट-बॉटम कागदी पिशवी तयार करू शकत होती.
-
लोकांकडून तिला चांगलीच पसंती मिळाली आणि ‘किराणा पिशवी’ म्हणून ओळखली जाऊ लागली.
-
१८८३ मध्ये चार्ल्स स्टिलवेलने मशीनचा शोध लावला ज्यामुळे चौकोनी बॉटम असलेल्या कागदाच्या पिशव्या तयार केल्या जाऊ लागल्या.
-
१९१२ मध्ये वॉल्टर डीबेनरने कागदाच्या पिशव्या अधिक मजबूत करण्यासाठी त्याला हँडल बसवले.
-
वर्षानुवर्षे अनेक प्रयोग होत कागदी पिशव्यांचे उत्पादन सुधारले.
-
कागदी पिशव्या वापरणे पर्यावरणपूरक आहे.
-
कागदी पिशव्यांना सहज रिसायकल करता येऊ शकते.
-
कागदी पिशव्या बायोडिग्रेडेबल आहेत त्यामुळे त्या सहज नष्ट होऊ शकतात.
-
कागदी पिशव्या वापरण्यास स्वस्त आहेत.
-
खराब कागदी पिशव्यांचा वापर तुम्ही घरी खत बनवतांनाही करू शकता.
-
कागदी पिशव्या त्यांच्या सुंदर रंगामुळे आणि त्यावरील प्रिंट्समुळे वापरायला जास्त छान वाटतात.
-
प्लास्टिकच्या पिशव्यांऐवजी जास्तीत जास्त कागदी पिशव्यांचा वापर करा. (सर्व फोटो सौजन्य : Pexels)

ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल