-
जीवनसत्त्वे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. त्यांच्याशिवाय आपले शरीर निरोगी राहू शकत नाही.
-
व्हिटॅमिन डी या जीवनसत्त्वाचा सर्वात मोठा स्त्रोत सूर्यप्रकाश आहे, म्हणूनच याला सनशाइन जीवनसत्व असेही म्हणतात.
-
अनेक अन्नपदार्थ खाऊनही आपण हे जीवनसत्त्व मिळवू शकतो. आज आपण जाणून घेऊया, या व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे आपल्या शरीराला कोणकोणते नुकसान होऊ शकते.
-
व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे आपले शरीर कमजोर होऊ लागते, त्यामुळे दिवसभर थकवा जाणवतो. हे टाळण्यासाठी तुम्ही रोज १५ ते २० मिनिटे उन्हात राहावे किंवा अंडी, दही, संत्री आणि गाईचे दूध यांचे सेवन करावे.
-
केस गळणे ही सध्याच्या काळातील एक सामान्य समस्या बनली आहे. यामुळे अनेकांना लहान वयातच टक्कल पडण्याचा त्रास सहन करावा लागतो.
-
शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असल्यास केस झपाट्याने गळू आणि तुटू लागतात. व्हिटॅमिन डी केसांच्या फोलिकल्स वाढवते.
-
शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असल्यास कॅल्शियम शोषण्यात समस्या होते, यामुळे आपली हाडे कमकुवत होऊन वेदना निर्माण होतात.
-
हाडांच्या आरोग्यासाठी कितीही कॅल्शियमयुक्त पदार्थ खाल्ले तरी शरीराला व्हिटॅमिन डी मिळाल्याशिवाय त्याचा फायदा होत नाही.
-
खूप कमी लोकांना हे माहित आहे की व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे आपल्या मानसिक आरोग्यावरदेखील परिणाम होतो.
-
यामुळे आपल्याला मूड बदलणे, तणाव, चिंताग्रस्त होणे यासारख्या परिस्थितींचा सामना करावा लागू शकतो.
-
जेव्हा शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता निर्माण होते, तेव्हा दुखापत झाल्यास ती लवकर बरी होत नाही. याशिवाय जखम भरण्यासही बराच वेळ लागतो. खरे तर व्हिटॅमिन डी जखमा भरण्यास आणि जखम भरण्यास मदत करते.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता कृपया तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. (सर्व फोटो : Pexeks/Freepik)

चंद्रग्रहणाचा सुतक काळ…’ही’ वेळ खूप सांभाळायची आहे! यंदा ९ तास आधीच सुरू होणार, नियम, वेळ जाणून घ्या