-
सफरचंदचे तुम्ही अनेक फायदे ऐकले असतील, मात्र आज आम्ही तुम्हाला असे फायदे सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही आजपासूनच सफरचंद खाणे सुरु कराल. आपण सफरचंद चहा बनवू शकता आणि पिऊ शकता. सफरचंद चहा पिण्याचे काय फायदे आहेत, जाणून घेऊया. (Photo: pixabay)
-
सफरचंद चहा घेतल्याने बद्धकोष्ठता आणि अॅसिडिटीची समस्या दूर होते. तसंच सफरचंदाचा चहा पिण्याने पचनशक्तीही सक्षम होते. (संग्रहित छायाचित्र)
-
सफरचंदाच्या चहामध्ये असणारी पोषक द्रव्यं रक्तातल्या साखरेचं प्रमाण संतुलित ठेवतात. यासाठी डायबेटीसच्या रुग्णांनी नियमितपणे सफरचंदाच्या चहाचं सेवन करणं आवश्यक आहे. (संग्रहित छायाचित्र)
-
सफरचंदात भरपूर प्रमाणात फ्लेव्होनॉइड्स असतात जे डोळे निरोगी ठेवण्यास मदत करतात. ज्यांची दृष्टी कमी आहे त्यांनी याचे सेवन करावे. (संग्रहित छायाचित्र)
-
सफरचंद चहा वजन कमी करण्यास खूप मदत करते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही वर्कआउट करूनही ते पिऊ शकता. हे प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होईलच पण त्यामुळे तुमची प्रतिकारशक्तीही वाढेल.(संग्रहित छायाचित्र)
-
सफरचंदाचा चहा पिण्याने केवळ वजनवाढीस अटकाव होत नाही, तर शरीराची इम्युनिटीही खूप वाढते. शरीर निरोगी राहण्यास मदत होते. (Photo: pixabay)
-
सफरचंदात मॅग्नेशियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन-सी आणि सोडियम मुबलक प्रमाणात आढळतात. हे सर्व आवश्यक पोषक हाडे मजबूत करण्यासाठी उपयुक्त ठरतात. यासाठी तुम्ही दररोज अॅपल टीचे सेवन करू शकता. (संग्रहित छायाचित्र)
-
सफरचंदात पोटॅशियम आढळते. पोटॅशियम युक्त अन्न खाल्ल्याने उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो. पोटॅशियम शरीरातील सोडियमचे संतुलन राखते. सोडियमचे संतुलन उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवते. (संग्रहित छायाचित्र)
-
नियमित सकस आहार घेतल्यास शरीराची रोगप्रतिकारशक्ती सक्षम राहते. काही जणांना सकाळी चहा घेण्याची सवय असते, तर काही जण केवळ गरम पाणी किंवा दूधच घेतात. सफरचंदाचा चहा घेणं प्रकृतीसाठी उत्तम ठरतं. (Photo: pixabay)

पैसाच पैसा! ५० वर्षानंतर सूर्याच्या राशीमध्ये निर्माण होईल त्रिग्रही योग, कोणाचे पालटणार नशीब अन् कोणाची होणार प्रगती, जाणून घ्या