-
त्वचा हा आपल्या शरीरातील सर्वात संवेदनशील अवयव असल्याने तिची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. इतर गोष्टींची काळजी घेत असताना आपण आपल्या त्वचेची काळजी घेणे विसरतो. त्यामुळे त्वचेच्या विविध समस्या उद्भवण्याची शक्यता असते.
-
यातही चेहऱ्यावर येणारे डाग, मुरूम, त्वचा लाल होणे अशा समस्या उद्भवतात. मग उशीर होण्यापेक्षा आधीपासूनच त्वचेची योग्य काळजी घेतल्यास त्याचा निश्चितच फायदा होऊ शकतो.
-
साधारणपणे त्वचेला काही झाल्यास त्यावर घरगुती उपाय आणि बाजारात मिळणारी वेगवेगळ्या प्रकारची सौंदर्यप्रसाधने वापरणे असे दोन मार्ग अवलंबले जातात.
-
चेहरा उजळण्यासाठी चेहऱ्याला आपल्या त्वचेला सूट होणारे एखादे क्रिम लावणे केव्हाही चांगले. पाहूयात रात्री चेहऱ्याला नाइट क्रीम लावून झोपण्याचे फायदे…
-
अनेकांना त्वचा कोरडी पडण्याची समस्या असते. रात्रीच्या वेळी हवेत गारवा असल्याने त्वचा जास्त कोरडी होते. मात्र त्वचेतील आर्द्रता टिकून राहण्यासाठी त्वचेवर क्रिम लावणे उपयुक्त ठरते.
-
त्यामुळे कोरडेपणा कमी होण्यासही मदत होते. याबरोबरच नाईट क्रिमच्या वापराने त्वचेला आवश्यक असणारी पोषक तत्वेही मिळतात.
-
चेहऱ्याची त्वचा चांगली राहण्यासाठी त्वचेतील रक्ताभिसरण सुरळीत होणे आवश्यक असते.
-
क्रिम लावताना आपण सगळ्या चेहऱ्यावरुन हात फिरवतो. त्यामुळे रक्ताभिसरण क्रिया सुरळीत होण्यास मदत होते. यामुळे चेहऱ्याचा रंग उजळण्यासही मदत होते.
-
काही कारणांनी आपल्या चेहऱ्याला सूज येते किंवा अचानक खाज येण्यास सुरुवात होते.
-
मात्र रात्री झोपताना क्रिम लावल्याने खाज येणे किंवा इतर त्रास कमी होण्यास मदत होते. तसेच चेहऱ्यावर येणारी सूजही कमी होण्यास उपयोग होतो.
-
त्वचा तजेलदार आणि चांगली राहण्यासाठी तिला पोषण मिळणे आवश्यक असते. हे पोषण आपल्याला आहारातून मिळते. त्याचबरोबर क्रिममध्ये असणारे काही घटक त्वचेला पोषण देण्यास उपयुक्त ठरतात.
-
झोपताना क्रिम लावल्यास त्यातील घटकांमुळे त्वचेला पोषण मिळते आणि त्वचा मऊ होण्यास मदत होते.
-
वय वाढते तसे आपल्या चेहऱ्यावर अनेक बदल दिसू लागतात. मात्र आपले वाढलेले वय दिसू नये यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो. त्यामुळे झोपताना क्रिम लावणे हा वय लपविण्यासाठी उत्तम उपाय ठरु शकतो.
-
यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या येण्याचा वेग कमी होतो. मात्र हे क्रिम नेमके कोणते असावे याबाबत डॉक्टरांचा सल्ला घेतलेला केव्हाही चांगला.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. (सर्व फोटो : Pexels)

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल