-
गुळाचा उपयोग फक्त अन्न म्हणूनच नाही तर औषध म्हणूनही केला जातो. त्याची चव उत्तम आहेच पण तो आरोग्यासाठी देखील चांगला आहे. आज आम्ही तुम्हाला गुळाच्या अशा गुणधर्मांबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे शरीरात उद्भवणाऱ्या अनेक समस्यांपासून आराम मिळतो. (फोटो: फ्रीपिक)
-
पोटाशी संबंधित अनेक समस्यांचा इलाज गुळात दडलेला आहे. बद्धकोष्ठता, गॅस, अॅसिडीटी यासारख्या समस्या असतील तर गूळ खाणे फायदेशीर ठरू शकते. (फोटो: फ्रीपिक)
-
सर्दी किंवा खोकला झाल्यास गूळ आणि आले पाण्यात उकळून दिवसातून ३-४ वेळा प्यायल्याने खूप आराम मिळतो. (फोटो: फ्रीपिक)
-
जर एखाद्या व्यक्तीचे हिमोग्लोबिन कमी असेल, तर त्याने दररोज गुळाचा एक छोटा तुकडा खाण्यास सुरुवात केली तर त्याला मोठ्या प्रमाणात फायदा होतो. त्याचबरोबर गूळ खाल्ल्याने शरीरात लोहाची कमतरता भासत नाही. (फोटो: फ्रीपिक)
-
गूळ रक्तदाब नियंत्रित ठेवण्याचेही काम करतो. हाय बीपीच्या रुग्णांना यावर नियंत्रण ठेवायचे असेल तर गुळाचे पाणी पिणे खूप फायदेशीर ठरते. (फोटो: फ्रीपिक)
-
घसा दुखत असल्यास तुळशीची काही पाने बारीक करून गूळ मिसळून खाल्ल्यास आराम मिळतो. (फोटो: फ्रीपिक)
-
जेवणानंतर गूळ खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते आणि वजन कमी करण्यातही फायदा होतो. (फोटो: @jaggerymanufacturer/instagram)
-
गुळामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरससारखे पोषक घटक देखील असतात, जे हाडांसाठी फायदेशीर असतात. (फोटो: @jaggerymanufacturer/instagram)

विराट कोहलीची दहावीची मार्कशीट पाहिलीत का?फोटो होतोय व्हायरल, १०वीत किती होते मार्क? गणित विषयामध्ये तर…