-
प्रिय व्यक्तीच्या सहवासामुळे आरोग्य चांगले राहते, याबाबतचे ‘ब्रेन, बिहेव्हिअर अॅन्ड इम्युनिटी’मध्ये संशोधन प्रकाशित झाले आहे.
-
प्रेम म्हणजे आजार असा वर्षांनुवर्षांचा समज आहे. प्रेमात पडणाऱ्या व्यक्तीवर उपचार करण्याचेही अनेक लोक समर्थन करतात. परंतु एका नव्या संशोधनानुसार प्रेयसी-प्रियकराच्या सहवासामुळे काही गंभीर आजारांना दूर ठेवण्यासाठी मदत होते.
-
अनेकदा प्रेमात पडल्यानंतर खूप नुकसान होतं असं म्हटलं जातं. पण प्रेमाचे अनेक फायदे असल्याचं आता समोर आलं आहे.
-
प्रिय व्यक्तीच्या सहवासामुळे शरीर आणि मानसिक स्थितीचे नुकसान करणाऱ्या संप्रेरकांचे प्रमाण कमी होते.
-
सदृढ आरोग्यासाठी उपयुक्त असलेल्या संप्रेरकांमध्ये वाढ होते, असे ‘नॉर्थ कॅरोलाइना’ विद्यापीठाने केलेल्या संशोधनानंतर स्पष्ट झाले आहे.
-
या संशोधनासाठी प्रेमात पडलेल्या ५० व्यक्तींची निवड करण्यात आली होती.
-
५० लोकांना प्रिय व्यक्तीच्या सहवासात तीन महिने व्यतीत केल्यानंतर त्यांच्या आरोग्यासंबंधी माहितीचे विश्लेषण करण्यात आले.
-
या लोकांच्या विविध शारीरिक चाचण्याही करण्यात आल्या.
-
या चाचण्यानंतर प्रियकर-प्रेयसीच्या सहवासामुळे मधुमेह, लठ्ठपणा आणि कर्करोगासारख्या आजारांचा धोका कमी झाल्याचे आढळले. (Photos : Pexels)

“मी प्रत्येक वेळी सावध…”, करिश्मा कपूरने सांगितला गोविंदाबरोबर काम करण्याचा अनुभव; म्हणाली…